आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोनाल्‍ड ट्रम्प-सीआयए यांच्यात रशिया मुद्द्यावरून तणाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाच्या हस्तक्षेपाच्या मुद्द्यावर नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेची गुप्तचर संघटना सीआयए यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. निवडणुकीत ट्रम्प यांना विजयी करण्यासाठी रशियाने हस्तक्षेप केला होता, असा दावा सीआयएने आपल्या अहवालात केला होता. ट्रम्प यांनी सीआयएवर टीका करताना म्हटले आहे की, ‘सद्दाम हुसेन यांच्याकडे व्यापक संहारक शस्त्रास्त्रे आहेत, असा दावा करणारे हेच लोक होते.’ नवनिर्वाचित अध्यक्ष आणि सीआयए यांच्यात मतभेद आणि वाद निर्माण होण्याची अमेरिकेत ही पहिलीच वेळ आहे.

सीआयएने आपल्या अहवालात म्हटले आहे की, अध्यक्षपद निवडणुकीत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या सरकारने हॅकिंग करून फक्त अमेरिकन निवडणूक प्रक्रिया कमजोर केली. एवढेच नाही तर रिपब्लिकन उमेदवार ट्रम्प यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. सीआयएच्या विश्लेषकांचे म्हणणे आहे की, आम्ही हा अहवाल निवडणुकीदरम्यान जाहीर करण्यास कचरत होतो. त्या वेळी डेमोक्रॅट उमेदवार हिलरी क्लिंटन असे आरोप करत होत्या.

सीआयएचा अहवाल सध्या वर्गीकृत असून सार्वजनिक झालेला नाही. ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेने म्हटले आहे की, निवडणूक संपली आहे, आता पुढे जायला हवे. माध्यमांच्या वृत्तानुसार, या प्रकरणात ट्रम्प आणि त्यांच्या पक्षात मतभेद आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या अनेक संसद सदस्यांचे म्हणणे आहे की, गुप्तचर संस्थेने बंद खोलीत रशियाच्या हस्तक्षेपाचे पुरावेही दाखवले आहेत.
शरीफ यांचा दूत आठवड्यापासून प्रतीक्षेत, ट्रम्प यांची टीम भेटलीच नाही
ट्रम्प यांच्या टीमशी परिचय करून घेण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे दूत तारिक फातेमी हे अमेरिकेत आठवडाभरापासून तळ ठोकून आहेत; पण त्यांना ट्रम्प यांच्या ट्रान्झिशन टीमची भेटच मिळाली नाही, असे वृत्त माध्यमांनी रविवारी दिले.

फातेमी हे शरीफ यांचे परराष्ट्रविषयक विशेष सहायक आहेत. त्यांनी मावळत्या ओबामा प्रशासनातील अधिकाऱ्यांची तसेच अमेरिकन संसद सदस्यांची भेट घेतली. आता या आठवड्यात ट्रम्प यांच्या टीमशी भेट होईल, अशी आशा ते बाळगून आहेत. अशा भेटी झाल्या की, पाकिस्तान दूतावास प्रसिद्धिपत्रक जारी करते आणि अमेरिकन प्रशासनाने विविध मुद्द्यांवर पाकिस्तानची भूमिका चांगल्या प्रकारे जाणून घेतली असा दावा करते, असे या वृत्तात म्हटले आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला फातेमी यांनी न्यूयॉर्कला भेट दिली होती. तेथून ट्रम्प यांचा व्यवसाय चालतो. पण पाकिस्तानी दूतांनी सांगितले की, फातेमी हे तेथे संयुक्त राष्ट्रांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी गेले होते आणि ते त्याच दिवशी
वॉशिंग्टनला परतले.

पुढच्‍या स्‍लाइडवर वाचा, दोन्ही पक्षांचे संगणक हॅक झाले होते
बातम्या आणखी आहेत...