आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

US: मुस्लीमांच्या प्रवेशावर असावा बॅन, म्हणाले राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार ट्रम्प

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक कँपेनदरम्यान डोनाल्ड ट्रम्प. - Divya Marathi
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक कँपेनदरम्यान डोनाल्ड ट्रम्प.
न्यू जर्सी - प्रेसिडेंशियल कँडिडेट डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत मुस्लीमांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी लावण्याची मागणी केली आहे. या वक्तव्यानंतर विरोधकांनी ते वेडे झाले असल्याची टीका केली आहे.

अब्जाधीश उद्योगपती...
- डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. रिपब्लिकन पक्षाने त्यांना उमेदवार बनवले आहे.
- ट्रम्प हे आब्जाधीश उद्योगपती आहेत. जेव्हापासून ते उमेदवार बनले आहेत, त्यानंतर त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत.

का दिली अशी प्रतिक्रिया...
- ट्रम्प यांच्या कँपेनमध्ये असे म्हटले गेले की, जोपर्यंत संपूर्ण देशाला नेमके काय घडत आहे हे समजत नाही, तोपर्यंत अशा प्रकारचा बॅन असायला हवा.
- स्टेटमेंटमध्ये असेही म्हटले गेले की, अमेरिकेच्या लोकांप्रती मुस्लीमांमध्ये जी घृणा आहे त्यामुळे अशा प्रकारची मागणी करण्यात येत आहे.
- गेल्या आठवड्यामध्ये सॅन बर्नार्डिनोच्या कम्युनिटी सेंटरवर फायरिंग झाली होती. त्यात 14 जण ठार झाले होते. हल्लेखोर दाम्पत्य सय्यद फारुक आणि तश्फीन मलिक पाकिस्तान वंशाचे मुस्लीम असल्याचे सांगण्यात आले.

आधीही दिली आहेत वादग्रस्त वक्तव्ये...
- ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यानुसार अमेरिकेत 11 सप्टेंबर 2001 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर मुस्लीमांनी आनंद साजरा केला होता. याबाबच विचारणा केल्यानंतर ते म्हणाले होते की, त्यांचे म्हणणे पूर्णपणे योग्य होते.
- ट्रम्प काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की, मी राष्ट्राध्यक्ष बनलो तर, अमेरिकन नागरिकांना नोकरीवरून काढून विदेशातील तरुणांना नोकरी देणाऱ्या कंपन्यांना एच-1बी व्हिजा जारी करणार नाही. जस्टीस डिपार्टमेंट त्यांच्या विरोधात कडक कारवाई करेल असेही ते म्हणाले होते.
- त्यांनी भारतीयांसह विदेशींना नोकरी देण्याच्या मुद्द्यावर नाराजी व्यक्त केली होती.
पुढील स्लाइड्सवर वाचा, दिवाळखोरीनंतरही पुन्हा बनले अब्जाधीश...
बातम्या आणखी आहेत...