आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रम्प यांना मतदान करा किंवा अणुयुद्धासाठी तयार राहा! झिरिनोव्स्की म्हणाले- हिलरींमुळे तिसरे महायुद्ध शक्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को - अमेरिकेच्या नागरिकांकडे दोनच पर्याय आहेत. एकतर त्यांनी अध्यक्षपद निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना मतदान करून अध्यक्ष बनवावे किंवा मग अणुयुद्धासाठी तयार राहावे. हा इशारा दिला आहे रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांचे जवळचे सहकारी ब्लादिमीर झिरिनोव्स्की यांनी.
एका मुलाखतीत झिरिनोव्स्की म्हणाले की, मॉस्को आणि वॉशिंग्टन यांच्यातील वाढता धोकादायक तणाव कमी करू शकतील असे ट्रम्प हे एकमेव व्यक्ती आहेत. ट्रम्प यांच्या डेमोक्रॅटिक प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन तिसरे जागतिक महायुद्ध भडकवू शकतात.
झिरिनोव्स्की हे क्रेमलिन समर्थक लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते आहेत. हा पक्ष गेल्या संसदीय निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर होता. अत्यंत आक्रमक आणि वादात राहणारे नेते अशी त्यांची ओळख आहे. लोक त्यांच्याकडे एक विनोदी व्यक्तिमत्त्व म्हणूनही पाहतात. ते म्हणाले की, रशिया आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू होईल तेव्हाच दोन्ही देशांतील संबंध यापेक्षाही वाईट होऊ शकतात. अमेरिकेच्या लोकांना शांतता हवी असेल तर ट्रम्प यांना मत द्यायचे आहे हे त्यांनी ८ नोव्हेंबरला होणाऱ्या अध्यक्षपद निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी लक्षात ठेवावे. पण जर त्यांनी हिलरी यांना मत दिले तर ही युद्धासाठीची निवडणूक होईल. जगात प्रत्येक ठिकाणी हिरोशिमा आणि नागासाकीच दिसतील.
रशिया-अमेरिकेच्या संबंधांत तणाव
सिरिया आणि युक्रेनच्या मुद्द्यावरून रशिया आणि अमेरिका यांच्यात तणाव निर्माण झाला असतानाच झिरिनोव्स्की यांचे हे वक्तव्य आले आहे. रशियाने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि उद्योगपतींना आपले नातेवाईक आणि मुलांना परदेशातून परत बोलावण्याचे आदेश जारी केले आहेत. बुधवारीच रशियाने अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे.
रशियावर सायबर हल्ल्यांचा आरोप
व्हाइट हाऊस आणि हिलरी क्लिंटन यांनी रशियावर सायबर हल्ले करत असल्याचा आरोप लावला आहे. विकिलिक्सनेही बुधवारी हिलरी क्लिंटन यांच्या गोपनीय कागदपत्रांची आणखी एक मालिका जारी केली. वॉशिंग्टनच्या आरोपांना उत्तर देताना पुतीन म्हणाले की, अमेरिकेच्या अध्यक्षपद निवडणुकीवर कुठलाही प्रभाव टाकण्याचा प्रयत्न रशिया करत नाही.
बातम्या आणखी आहेत...