आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिलरी यांच्या पराभवाच्या जखमा भराव्यात म्हणून त्यांना त्रास देऊ इच्छित नाही : ट्रम्प

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प. निवडणुकीच्या काळात अमेरिकेच्या जवळपास सर्वच वृत्तपत्रे वृत्तवाहिन्यांच्या विरोधात उघडपणे बोलले. जिंकल्यानंतर त्याच मीडियाला स्वत:हून भेटीसाठी आपल्या कार्यालयात बोलावले. अनेक वृत्तवाहिन्या वृत्तपत्रे गेलीही. या भेटीत ट्रम्प यांनी सर्वच मीडियाला सडकून फटकारले. मात्र न्यूयॉर्क टाइम्स ट्रम्प यांच्या भेटीला गेले नाही. ते पाहून स्वत: ट्रम्प न्यूयॉर्क टाइम्सच्या १६ व्या मजल्यावरील कार्यालयात पोहोचले. संबंधांत गोडव्याचे बोलून ऑफ दी रेकॉर्ड चर्चेचा प्रस्ताव दिला. मात्र टाइम्सचे मालक शुल्जबर्गर म्हणाले, ‘नो सर, येथे काहीही ऑफ दी रेकॉर्ड नसते. शेवटी ट्रम्प ऑन दी रेकॉर्ड बोलण्यास राजी झाले. विजयानंतरच्या पहिल्या मुलाखतीसाठी! न्यूज रूममध्ये प्रश्नोत्तरे झाली. वाचा ट्रम्प यांची मुलाखत फक्त दिव्य मराठीत...

- एक छोटा समूह वांशिक आधारावर रागात आहे. तुमच्या बोलण्याने तो अजून सक्रिय आहे? त्यांना कसे निपटणार ?
मीकोणालाही सक्रिय करू इच्छित नाही. मी अशा समूहांना नाकारतो. चार वर्षांपूर्वी असे लोक कुठे होते, हे मला माहीत नाही. पण आता सक्रिय होत असतील तर मी कारणे पाहीन.

- तुम्ही ‘सबका साथ’ च्या गप्पा मारत आहात, मग हिलरींचे ई-मेल्स फाउंडेशनबद्दल बोललात त्याचे काय ?
(हसत)क्लिंटनना आधीच खूप त्रास झाला. मी आणखी त्रास देऊ इच्छित नाही. त्यांच्या पराभवाच्या जखमा भराव्यात, असे मला वाटते. माझा भर हेल्थकेअरवर आहे. मी इमिग्रेशन विधेयकाचा विचार करतोय.

- क्लिंटनबाबतचे दावे पूर्ण केले नाही तर नाराज समर्थकांना कसे समजावाल?
मीत्यांना सांगेन की, आपण अनेक पद्धतीने देशाला वाचवू शकतो. आपला देश कठीण वाईट स्थितीतून जात आहे. मी भेदभाव, फुटीरतावादाबद्दल बोलतोय. लोकांना कळेल. एका वेगळ्या दिशेने जाण्याची ही वेळ आहे. आपण सर्व एक दिसू ,असा दिवस नक्की येईल.

- राष्ट्रपतिपद आणि कंपनीदरम्यान हितसंघर्षाची शक्यताही आहेच?
मलाकंपन्यांची अजिबात चिंता नाही. त्या माझी मुले चालवतील. पण जर भारत कॅनडाच्या एखाद्या भागीदाराशी डील केली असेल आणि ते माझ्या भेटीला येऊन फोटो काढू इच्छित असतील तर त्यांना मी तुमच्याशी मला बोलायचे नाही, असे म्हणू का?

- राष्ट्रपती होण्याच्या दोन हप्ते आधी भारतीय बिझनेस पार्टनरला भेटले होते?
लोकभारत वा इतरांबद्दल बोलत असतील तर मी म्हणेन की काही कारणाने भारताशी संबंध सुधारत असतील, तर ती चांगली गोष्ट आहे. पण तेथून जे पार्टनर आले आहेत, ते अत्यंत यशस्वी लोक आहेत, हे मी नक्की सांगेन.

जे कुणी करू शकले नाही त्या कामाची जबाबदारी जावयावर
ट्रम्प यांना त्यांचे जावई जॅरेडे यांच्याबद्दल विचारल्यावर ते म्हणाले, जे आजपर्यंत कुणीही पूर्ण करू शकले नाही, ती जबाबदारी त्यांना देईन. जॅरेड यहुदी आहेत. इस्रायल- फिलिपाइन्स वाद सोडवायला त्यांनी मदत करावी. ते मोठे यश असेल. कारण आजवर त्यात कोणीही यशस्वी होऊ शकले नाही.
- तुम्ही निवडणूक काळात हवामान बदल विषयक पॅरिस करारावर काहीच बोलला नाहीत. तुमच्याकडे जगातील सर्वात सुंदर गोल्फ लिंक्स आहेत. त्यावर आक्षेप घेण्यात आले. याचे तुम्ही काय कराल?
खुल्या मनाने विचार करणार. तुमची याविषयावर वेगवेगळ्या प्रकारची मते बनवू शकता. काही हुशार स्मार्ट लोकांना तुमचे म्हणणे पटणार नाही. स्वच्छ हवा, पाण्ी खूप गरजेचे आहे. तुम्ही गोल्फ कोर्सचा मुद्दा उपस्थित केला, मात्र तुम्हाला माहित असेल की मला पर्यावरण विषयक अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

- हवामान बदलाला मानवी हस्तक्षेप जबाबदार अाहे असे वाटत नाही का?
काहीटप्प्यांपर्यंत हे खरे अाहे, मात्र ते कुठपर्यंत ? यातून आमच्या कंपन्यांचे किती नुकसान होईल यावरही ही गोष्ट अवलंबून आहे. तुम्हाला समजून घ्यावे लागेल की आमच्या कंपन्या आता स्पर्धेतून बाहेर आल्या आहेत.

- तुम्ही गुंतवणूक आणि नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते. सुरुवातीची काही वर्षे पायाभूत सुविधांवर भर असेल का?
त्यावरचलक्ष असेल असे नाही, मात्र ही महत्त्वाची गोष्ट आहे. आम्ही इतर बऱ्याच गोष्टी करणार आहोत. कर, नियम, आरोग्याची काळजी आदींमध्ये. आरोग्यासाठी लोक १०० टक्के भुगतान करीत आहेत, मात्र त्या बदल्यात त्यांना काहीही मिळत नाही. १६ हजार डॉलर देऊनही लोकांचे आरोग्य सुविधा मिळत नाहीत. अशा अनेक गोष्टी आहेत.

- राष्ट्राध्यक्ष ओबामा तुम्हाला भेटल्यानंतर म्हणाले की, तुम्ही त्यांच्या मतांशी सहमत होता. त्याबद्दल काही सांगा?
राष्ट्राध्यक्ष ओबामा यांची भेट खूप चांगली झाली. यापूर्वी मी त्यांना कधीच भेटलो नव्हतो. मला ते आवडले. आमची भेट जास्तीत जास्त १५ मिनिटे होईल, असे वाटले होते. मात्र ती दडी तास चालली. त्यांनी सहमत हा शब्द वापरला असेल तर तो चुकीचा नसेल. पण त्याच्याशी सहमत नाही. भेटीनंतर त्यांनी चांगल्या गोष्टी सांगितल्या. मी सुध्दा त्यांच्याबद्दल चांगले बोललो. आम्ही दोघे खूप वेगळे आहोत. मला वाटले होते की मला ते आवडणार नाही. पण ते मला चांगले वाटले. त्यांनी मला देशाची सर्वात मोठी समस्या सांगितली, पण मी ती सार्वजनिक करणार नाही. मला थोडे आश्चर्यही वाटले.

- तुम्ही कुणावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करता, जसे की विंड फार्म?
ठिकआहे, मी कुणावरही प्रभाव टाकू इच्छित नाही, कारण मला त्याची गरज नाही. हे सांगणे थोडे कठिण आहे.

- होय, मात्र त्याची रचना कशी असेल..?
आता मी सर्व काही कायद्याच्या चौकटीत पाहतो. जिथे तुम्हाला विश्वास मिळतो. इथे लिखीत स्वरुपात काहीच नाही. दुसऱ्या शब्दाला याला थेअरी म्हणतात. मी युनायटेड स्टेट्सचा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर १०० टक्के माझा व्यावसाय चालवेन. मी माझ्या व्यापार विषयक धनादेशांवर सह्या करेन. तुम्हाला माहित असेल की मी थोडा पारंपरिक विचार मानणारा आहे. मी धनादेशांवर सह्या केल्यामुळे मला संगणकावर नेमके काय चालू हे कळेल. हजाराे धनादेश असेच पाठवले जात आहेत.मी वारंवार सांगतोय की याचा अर्थ मी माझ्या कंत्राटदारांवर थोडी नजर ठेवेन. मात्र मी आता त्या वातावरणात आहे. मी माझ्या व्यवसायातील अधिक हिस्सा इरिक ट्रम्प, डान ट्रम्प आणि इंवाका ट्रम्प यांना सोपवित आहे. मात्र प्रत्यक्षात मी माझा व्यवसाय उत्तमपणे चालवेन. आणि देशालाही व्यवस्थित चालवेन. मात्र खुलेपणाने हे सांगितले तर तुम्हाला अशी संपत्ती आणि भांडवल कुणाकडेही दिसणार नाही. हे वेगवेगळे आहे.

- आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेची काय भूमिका असेल? तुम्ही हे समजू शकता?
हा खूप मोठा प्रश्न आहे.

- गेल्या५० वर्षांत आपण जगात संतुलन बनवण्याचे काम केले. जे आपल्या हिताचे होते, त्यासाठी खूप मोठी किंमत चुकवली. आम्ही आपल्याकडून जाणून घेऊ इच्छितो की, आपली भूमिका मर्यादित होत आहे काय?
मलानाही वाटत की आपण राष्ट्रनिर्माते बनले पाहिजे. मात्र आम्ही असेच केले आहे. इराक जाण्याचा निर्णय असाच होता. आपल्या देशाच्या इतिहासात माझ्या मते ही सर्वात मोठी चूक होती. यातून बाहेर पडावे लागेल. यामुळे आयएसआयएसच्या उदयासह अनेक वाईट घटना घडल्या. याप्रकरणी वेगळे डील करता येईल.

- नाटो, रशियाविषयी काय बोलाल?
ती भयानक चूक होती. सिरिया समस्येचा उपाय शोधला पाहिजे. आपण नेहमीच युद्ध करत राहणार काय? सिरीयावर हल्ला रशियावरील हल्ल्यासारखा आहे. सिरियावर माझ्याकडे एक मजबूत कल्पना आहे. आतापर्यंत जे काही घडले ते भयानक होते. अनेकांचे प्राण गेले. मोठा भूभाग ढिगाऱ्यात परिवर्तित झाला. हे लाजीरवाणे आहे. काही तरी करावे लागेल.

- रशियाविषयी रिसेट बटन दाबले काय?
मी रिसेट शब्दप्रयोग करणार नाही. रशियाशी चांगले संबंध असावे अशी माझी धारणा आहे. मला वाटते त्यांनाही असेच वाटत असावे. हे आपल्या दोघांच्याही हिताचे आहे. मी विशिष्ट धारणांवरून चालने पसंत करतो. प्रचारादरम्यान म्हटले जात होते की ट्रम्प पुतीन यांच्यावर तसेच पुतीन ट्रम्प यांच्यावर प्रेम करतात. असे घडले तर चांगले होणार नाही का? दोघे मिळून आयएसचा सामना करू. हे योग्य होणार नाही काय? आयएसचा सामना धोक्यासोबतच प्रचंड खार्चिक आहे. त्यांना वाटते की माझे पुतीनसमवेत जाणे चुकीचे आहे. मी याला सकारात्मक मानतो. रशियाच नव्हे इतर देशांशीही चांगले संबंध असावेत असे वाटते.

- तुम्ही म्हणताय की सिरिया प्रश्नावर तुमच्याकडे खूप चांगली कल्पना आहे...
मीफक्त इतकेच म्हणू शकतो. सिरियाविषयी इतकी घाईगडबड करायला नको. या विषयावर ऑफ रेकॉर्ड बोलता येणार नाही काय?

- तुम्ही ऑफ रेकाॅर्ड काही बोलू इच्छिता. चला मग आपण लगेचच ऑफ रेकॉर्ड चर्चा करू...
मग ऑफ रेकॉर्ड बोलणे होते...

- अपमान आणि मानहानीवर संविधानात संशोधन व्हायला पाहिजे का?
मलाकुणी तरी सांगितले होते की, या कायद्यात लवचिकता अाणणे ही चांगली कल्पना आहे.

(न्यूयॉर्क टाइम्सच्या विशेष सहकार्याने)
बातम्या आणखी आहेत...