आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अयोग्य शब्दाबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलगिरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदाच स्वत:च्या बोलण्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. कधी कधी बोलताना ‘योग्य शब्द’ वापरत नाही. वेगवेगळ्या विषयांवर मत मांडताना बोलण्याचा आेघात असे घडते. काही जणांना माझ्या बोलण्याचे वाईट वाटले असेल किंवा ते दुखावले गेले असल्यास त्यांची क्षमा मागतो, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

वाद वाढल्यानंतर अशा प्रकारची भाषा वापरली जाते. अयोग्य शब्द तोंडी येतात. मी काही राजकीय पुढारी नाही. माझे संपूर्ण आयुष्य रोजगारनिर्मिती, उद्योगात गेले आहे. म्हणून राजकीयदृष्ट्या माझी भाषा कदाचित योग्य नसेल. मला तशी भाषा अवगत करायलादेखील खूप वेळ द्यावा लागणार आहे. ही गोष्ट तशी कठीण आहे, असे ७० वर्षीय ट्रम्प यांनी उत्तर कॅरोलिनातील एका सभेत म्हटले आहे.

राजकीय नेता म्हणून बोलताना शब्द चुकत असतील; परंतु सत्य तेच बोलेन, हे वचन मात्र पाळणार आहे. तुमच्यासाठी सत्य बोलत राहणार आहे. कारखान्यातील नोकरी गमावणारे कामगार असतील किंवा इतर उपेक्षित समुदायासाठी सत्य बोलत राहणार आहे. दरम्यान, दहशतवाद्यांना शोधून ठार करू, असे ट्रम्प यांनी गुरुवारी आयोजित एका सभेत म्हटले.

विवस्त्र पुतळे
ट्रम्प यांच्या विरोधी गटाने त्यांचे भल्या मोठ्या आकारातील विवस्त्र पुतळे मांडून निषेध केला आहे. ट्रम्प कधीही राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाहीत, अशी भावना या गटाने मांडली आहे. न्यूयॉर्क, सॅनफ्रान्सिस्को, लॉस एंंजलिस, सिएटल, क्लीव्हलँड या पाच शहरांत असे विवस्त्र पुतळे उभारण्यात आले आहेत. पिवळी छटा असलेले डोक्यावरील केस व हाताची घडी अशा अवतारात ट्रम्प यांचे पुतळे लक्ष वेधून घेत आहेत.
बातम्या आणखी आहेत...