आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदूंबद्दल आदर; अध्यक्ष झालाे तर भारताशी बळकट संबंध, ट्रम्प यांची ग्वाही, मोदींचे कौतुक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एडिसन (न्यूजर्सी) - ‘मला हिंदूंबद्दल आदर आहे. अध्यक्ष झालो तर भारतासोबतचे संबंध आणखी बळकट करेन. मी अध्यक्ष झालो तर भारतीय आणि हिंदू समुदायाचा खरा मित्र व्हाइट हाऊसमध्ये असेल याची खात्री देतो,’ अशी ग्वाही अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. भारताला वेगाने विकासमार्गावर नेल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली.

हा आदर फक्त हिंदूंबद्दलच का, या प्रश्नावर ट्रम्प म्हणाले की, ‘प्रामाणिकपणे उत्तर द्यायचे झाले तर भारताबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. भारतात रिअल इस्टेटमध्ये नोकऱ्या वाढत असल्याचे मी पाहत आहे. हे चांगले संकेत आहेत. भारत एक शानदार देश आहे.’ रिपब्लिकन हिंदू आघाडीच्या निधी उभारणी कार्यक्रमात ट्रम्प बोलत होते. हा कार्यक्रम दहशतवादग्रस्त बांगलादेशी आणि काश्मिरी पंडितांसाठी रक्कम जमा करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.
ट्रम्प म्हणाले की, इस्लामिक दहशतवादाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी गोपनीय माहितीचे आदानप्रदान मी करेन. दोन्ही देशांतील लोकांची सुरक्षा लक्षात घेऊन भारतासोबत खांद्याला खांदा लावून काम करेन. भारत आणि अमेरिका उत्तम मित्र होतील. अमेरिकेसाठी भारतासोबतचे संबंध सर्वोच्च असतील. ट्रम्प यांनी एच १ बी व्हिसाचा कुठलाही उल्लेख केला नाही. भारतीय समुदायासाठी हा एक चिंतेचा महत्त्वाचा मुद्दा आहे.
कार्यक्रमात काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प ?
मोदींची स्तुती
> आर्थिक सुधारणा आणि नोकरशाहीत सुधारणा याद्वारे भारताला वेगाने विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी पंतप्रधान मोदी यांची मी प्रशंसा करतो.
> पंतप्रधान मोदी खूप ऊर्जावान आणि सुधारणावादी आहेत. मी त्यांच्यासोबत काम करण्याच्या प्रतीक्षेत आहे.
> तुमचे पंतप्रधान भारताचे विकास समर्थक नेते आहेत. त्यांनी करसंहिता सोपी केली, कर कमी केले, मजबूत अर्थव्यवस्थेत वार्षिक ७ टक्के वाढ, आमची अर्थव्यवस्था एवढ्या वेगाने पुढे जात नाही. तिची वाढ जवळपास शून्य आहे.

दहशतवादाबद्दल
भारताने खूप क्रूर दहशतवादाला तोंड दिले आहे. माझ्या पसंतीचे शहर मुंबईत झालेल्या हल्ल्यासह. मुंबई दहशतवादी हल्ला, संसदेवरील हल्ला अत्यंत घृणास्पद आणि धक्कादायक होते. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानशी निर्माण झालेला तणाव लवकरच संपेल, अशी अपेक्षा आहे.

हिंदू आणि भारत यांच्याविषयी
> मी हिंदूंचा खूप आदर करतो. माझे अनेक मित्र हिंदू आहेत. ते शानदार लोक असतात, महान उद्योजक असतात.
> मी भारतात दोन मोठ्या घटना पाहिल्या आहेत. माझे तेथे खूप यशस्वी, उत्कृष्ट भागीदार आहेत. मी १९ महिन्यांपूर्वी तेथे गेलो होतो. आता पुन्हा अनेक वेळा जाण्यास इच्छुक आहे.
पुढे वाचा, हिलरींना ड्रग्स टेस्टचे आव्हान..
बातम्या आणखी आहेत...