वॉशिंग्टन- अमेरिकेच्या प्रेसिडेंशियल इलेक्शनमध्ये रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लिमांच्या प्रवेशाबाबतचा मुद्दा पुन्हा एकदा उचलला आहे. अमेरिकेच्या एलजीबीटी नाइट क्लबमध्ये सुरू झालेल्या गोळीबारानंतर त्यांनी पुन्हा एकदा ही मागणी केली आहे. न्यू हॅम्पशायरमध्ये ट्रम्प म्हणाले, ''ही शूटिंग इमिग्रेशनचा मुद्दा आहे. मात्र याबाबत पुढे जरुरी विचार व्हावा.
आपल्याला मुस्लिमांना प्रवेश बंदी करावी लागेल.'' ट्रम्प यांनी शासनाच्या धोरणावरही प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी बराक ओबामा यांच्या राजीनाम्याची मागणी केली..
- ट्रम्प यांनी स्पष्टपणे म्हटले की, प्रेसिडेंट बनल्यानंतर आम्ही अशा लोकांच्या प्रवेशाचा मुद्दा गांभीर्याने घेऊ.
- ट्रम्प यांनी हल्लेखोर उमर मतीनबाबत प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, ''किलर अमेरिकेत होता कारण, आपण त्याच्या कुटुंबाला अमेरिकेत येऊ दिले.''
- ते म्हणाले, ''वाईट नितीमुळे अमेरिकेत असे हत्यारे येत आहेत.''
- उमर मतीनचा जन्म न्यूयॉर्कमध्ये झाला होता. त्याचे पॅरेट्स अफगाणिस्तानातून येथे आले होते.
- त्याने रविवारी ओरलँडोच्या एका एलजीबीटी नाइट क्लबवर फायरिंग केली होती.
- या फायरिंगमध्ये 53 जण ठार झाले.
ओबामा आणि हिलेरीवर निशाणा..
- सोमवारी ट्रम्प यांनी प्रेसिडेंट बराक ओबामा यांच्यावर निशाणा साधला.
- ते म्हणाले, ''मुसलमान आपल्यासोबत काम करतात आणि त्यांना (ओबामा) ठाऊक आहे की, काय सुरू आहे.''
- ट्रम्प यांनी ओबामा यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे.
- प्रेसिडेंशियल इलेक्शनमध्ये हिलेरी क्लिंटन यांच्याबाबत ट्रम्प म्हणाले, ''देशात जे काही वाईट होत आहे. त्यामध्ये हिलेरी यांचे अधिक समर्थन आहे.''
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटो..
ओरलँडो शूटिंगनंतर ट्रम्प यांनी केलेले ट्वीट्स.