आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लीम प्रवेशबंदी मुद्द्यावर ट्रम्प कायम, म्हणाले माझा विचार रूझवेल्ट सारखाच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुस्लीमांना प्रवेशबंदी करण्याच्या आपल्या वक्तव्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थन केले आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणेच आपले वक्तव्य असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. दुसऱ्या महायुद्दात जपानी-अमेरिकन्सच्या बाबतीत जे करण्यात आले तेच आपणही म्हणत असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केला त्यावेळी सुमारे 110000 लोकांना अमेरिकेन लष्कराच्या शिबिरांमध्ये स्थानबद्ध करण्यात आले होते. त्याच प्रकारचे मत आपण मांडले असल्याचे ट्रम्प म्हणाले आहेत. एका वाहिनीवरील कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले आहे. हे पाऊल उचलण्याव्यतिरिक्त आपल्याकडे दुसरा पर्यायच नसल्याचे ते म्हणाले आहेत. आपल्यामध्येच काही असे लोक आहेत जे आपल्या शहराला हानी पोहोचवू इच्छित आहेत, असेही ते म्हणाले.

ट्रम्प म्हणाले की ही बंदी काही काळापुरती असावी. आपण समस्येवर तोडगा शोधला की ही बंदी उठवायला हरकत नाही, असेही ट्रम्प म्हणाले आहेत. सोमवारी ट्रम्प यांनी मुस्लीमांना अमेरिकेत प्रवेशबंदी घालण्याची मागणी केली होती. अमेरिकेत गेल्या काही दिवसांत झालेल्या फायरिंगच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्याची मागणी ट्रम्प यांनी केली होती.

अमेरिकेतील जवळपास सर्वच प्रमुख नेत्यांनी ट्रम्प यांच्या यावक्तव्यावर टीका केली होती. अमेरिकेचे लश्करी मुख्यालय असलेल्या पेंटॉगॉनकडूनही ट्रॅम्प यांचे नाव न घेता टीका करण्यात आली. अमेरिकेच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर मुस्लीम आहेत. त्यामुळे अशाप्रकारचे व्क्तव्य तेढ निर्माण करणारे ठरू शकते असेही, ते म्हणाले आहेत.