आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प यांच्या नवीन प्रवेशबंदीमुळे अमेरिका सुरक्षित राहणार नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन  - मुस्लिमबहुल देशांतून अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अमेरिका सुरक्षित राहील असे वाटत नाही, असे परखड मत भारतीय-अमेरिकी लोकप्रतिनिधींनी व्यक्त केले.  

बंदीमुळे देश सुरक्षित राहील, अशी मांडणी केवळ चुकीची आहे. उलट अशा निर्णयामुळे अमेरिकी नागरिकांचे जगणे अधिक धोकादायक बनणार आहे. निर्णयामुळे मुस्लिम समुदाय एकटा पडणार आहे. परंतु त्याच वेळी देशांतर्गत दहशतवादाचे संकट रोखणे हेदेखील मोठे आव्हान आहे, असे मत कॅलिफोर्नियाच्या सिनेटर कमला हॅरिस यांनी व्यक्त केले आहे.  अॅमी बेरा, राजा कृष्णमूर्ती, रो खन्ना व प्रमिला जयपाल या लाेकप्रतिनिधींनीदेखील ट्रम्प यांच्या निर्णयाचा परिणाम होणार नाही, असे म्हटले होते. 
बातम्या आणखी आहेत...