आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 मिनीट बंद झाले होते ट्रम्प यांचे Twitter अकाऊंट, कंपनीच्या कर्मचाऱ्याने केले होते डिअॅक्टीवेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  यांचे ट्वीटर अकाऊंट गुरुवारी सायंकाळी 11 मिनीटांसाठी गायब झाले होते. यादरम्यान ट्रम्प यांच्या कार्यालयीन ट्वीटर अकाऊंट @realDonaldTrump सर्च केल्यानंतर मॅसेज येत होता की, सॉरी, हे अकाऊंट सध्या अस्तित्वात नाही. ट्वीटरने या घटनेनंतर लगेचच सांगितले की, कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे ट्वीटर अकाऊंट बंद झाले होते. 
 
ट्वीटर म्हणतोय, आम्ही चौकशी करतोय...
- ट्वीटरने प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटले आहे की, तब्बल 11 मिनीटांपर्यंत ट्रम्प यांचे अकाऊंट बंद झाल्यानंतर पुन्हा सुरु करण्यात आले. ही चुकी पुन्हा होऊ नये याची काळजी आम्ही घेऊ. तसेच संबंधित प्रकरणाची कसून चौकशी करतोय.
- कंपनीच्या स्पष्टीकरणानंतर @Twittergov वरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली. या पोस्ट मध्ये सांगण्यात आले की, अकाऊंट बंद करणाऱ्या कर्मचाऱ्याचा कामाचा अखेरचा दिवस होता. यासंदर्भात आम्ही आढावा घेत आहोत.
 
अकाऊंट बंद होण्याच्या या आहेत शक्यता
-  ट्रम्प यांचे ट्वीटर अकाऊंट बंद झाल्यानंतर अनेक शक्यतांची पडताळणी करण्यात येत आहे.
- काही लोकांचे म्हणणे आहे की, उत्तर कोरियाला धमकी दिल्याने ट्वीटरने ट्रम्फ यांचे खाते बंद केले.
- काहींनी शंका उपस्थित केली की, ट्रम्प यांनी स्वत: खाते डिअॅक्टिवेट केले असावे.
- ट्रम्प यांचे ट्वीटरवर तब्बल चार कोटी फॉलोअर्स आहेत. ट्रम्फ यांना स्वत:ला ट्वीटर खूप आवडते.
- 2012 मध्ये ट्रम्प म्हणाले होते की, सोशल मीडिया न्यूजपेपरप्रमाणे वाटतो. यामुळे कुठलेही नुकसान होत नाही.
बातम्या आणखी आहेत...