आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माझ्याविरोधात षड््यंत्र, ट्रम्प यांचे प्रत्युत्तर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - माझ्याविरोधातील लैंगिक आरोप हे विरोधकांनी केलेले ‘षड््यंत्र’ आहे. सर्व आरोप बिनबुडाचे आणि अतर्क्य आहेत, अशा शब्दांत रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.
ट्रम्प यांच्यावर गुरुवारी पाच महिलांनी लैंगिक अत्याचार, विनयभंगाचे आरोप केले. ट्रम्प यांनी हे आरोप फेटाळले. खरे तर देशातील कॉर्पोरेट मीडिया पत्रकारितेत सहभागी नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्यायला हवे. त्यांचे राजकीय असे उद्दिष्ट आहे. एखादी आर्थिक संस्था किंवा राजकीय गट आणि अशा प्रकारच्या प्रसारमाध्यमांत फरक राहिलेला नाही, असा आरोप ट्रम्प यांनी केला. फ्लोरिडातील एका निवडणूक सभेत ते बोलत होते. हिलरी क्लिंटन यांना कोणत्याही प्रकारे निवडून आणायचे. भलेही त्यात कोणाचे का नुकसान होईना, हाच त्यांचा एकमेव अजेंडा आहे. त्यांच्यासाठी हे युद्ध आहे; परंतु आपल्या देशासाठी हा अस्तित्वाचा संघर्ष आहे. म्हणूनच ८ नोव्हेंबर ही आपली शेवटची संधी आहे, असे आवाहन त्यांनी केले.
कायदेशीर नोटीस : दोन महिलांच्या आरोपानंतर ट्रम्प गुरुवारी जास्त भडकले. ट्रम्प यांनी बळजबरीने स्पर्श केल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यावर ट्रम्प यांनी हे उत्तर दिले. त्याचबरोबर महिलांचे आरोप प्रकाशित करणाऱ्या न्यूयॉर्क टाइम्सला कायदेशीर नोटीसही पाठवली आहे.
बातम्या आणखी आहेत...