आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Donald Trump Won Five Contests Across The Northeast States

पाच राज्यांमध्‍ये ट्रम्प यांचा विजय, म्हणाले - अध्‍यक्षीय निवडणुकीत उमेदवारीची शर्यत समाप्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेच्या अध्‍यक्ष पदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवारी मिळवण्‍याच्या शर्यतीत सर्वात पुढे असणारे डोनाल्ड ट्रम्प यांनी पाच राज्यांत विजय मिळवला आहे. आता पक्षाची उमेदवारी मिळवण्‍याची शर्यत संपल्याचे ट्रम्प यांनी सांगितले आहे. कुठे विजय मिळवला डोनाल्ड ट्रम्प यांनी...

- मंगळवारी झालेल्या निवडणुकीत ट्रम्प यांनी ईशान्य अमेरिकेतील मेरीलँड, पेन्सीलव्हानिया, डेलावेअर आणि रोड आयलँड या पाच राज्यात विजय मिळवला.
- विजयाने खुश दिसणारे ट्रम्प म्हणाले, की शर्यत संपली आहे. माझ्या बाजूने तर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवारी मिळवण्‍याची शर्यत समाप्त झाली आहे.
- डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवारीच्या शर्यतीत आघाडीवर असणा-या हिलरी क्लिंटन यांनी तीन राज्यात विजय मिळवला आहे. मात्र त्यांना रोड आयलँडमध्‍ये बर्नी सॅंडर्सकडून मोठी टक्कर मिळाली.
सध्‍या इतर उमेदवारांची स्थिती काय आहे?
- खरी लढत ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांच्यात असेल हे हळुहळू स्पष्‍ट होत आहे.
- क्लिंटन यांना आव्हान देणारे सँडर्स मागे पडले आहेत. दुसरीकडे ट्रम्प यांच्यासमोर टेड क्रूझ आणि जॉन केशिक यांचे आव्हान गळून पडत आहे.
- ट्रम्प मंगळवारी म्हणाले, की मी आता स्वत:ला अध्‍यक्ष पदाचा उमेदवार मानतो.
पुढे वाचा... हिलरी क्लिंटन काय म्हणाल्या?