आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोकादायक हितसंबंध : ट्रम्प यांची भारतात गुंतवणूक; अमेरिकी धोरणावर परिणाम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेत रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यास व्यवसायामुळे भारताशी त्यांची जास्त जवळीक राहील आणि त्यांचे विदेश धोरण पाकिस्तानविरुद्ध होऊ शकते. अमेरिकी मासिक न्यूजवीकने आपल्या वृत्तात लिहिले की, ट्रम्प यांनी भारतातील पुणे व गुडगावमधील रियल इस्टेट प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली आहे. येत्या जानेवारीत ते अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यास त्यांच्या विदेश धोरणावर याचा निश्चित परिणाम होऊ शकतो.

मासिकाने ट्रम्प यांच्या परदेशातील गुंतवणुकीवर कव्हर स्टोरी प्रकाशित केली आहे. त्यानुसार जुलैमध्ये झालेल्या परिषदेत ट्रम्प ऑर्गनायझेशनने घोषणा केली होती की, सत्तेत आल्यास ते दक्षिण आशियाई देशांवर विशेष लक्ष देतील. मासिकानुसार, ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यास हितसंबंधासाठी धोकादायक उदाहरण ठरू शकते.

ते भारताविरुद्ध कडक भूमिका अंगीकारत असतील तर सरकार त्यांना तसेच सोडून देईल काय,असा सवाल मासिकाने उपस्थित केला आहे. पुणे ट्रम्प टॉवरच्या भागीदारांविरुद्ध चौकशी केली जाणार नाही का? तसेच त्यांनी पाकिस्तानविरुद्ध कडक भूमिका घेतल्यास ही कृती अमेरिकी सामरिक हितांविरुद्ध ठरणार नाही का? पुण्याच्या ट्रम्प टॉवरमध्ये खोडा घालणाऱ्या अधिकाऱ्यांचे त्यांना समाधान करावे लागणार नाही का? वृत्तानुसार, ट्रम्प यांनी २०११ मध्ये भारतातील प्रॉपर्टी डेव्हलपर रोहन लाइफस्केप्सकडून आपल्या नावे ६५ मजली इमारत बांधकाम करण्याचा करार केला होता. रोहनच्या वतीने कंपनीचे एक संचालक कल्पेश मेहता यांनी चर्चा केली होती. मेहता नंतर भारतात ट्रम्प यांचे भारतातील बिझनेस प्रतिनिधी झाले.

भाजप काँग्रेसमध्ये मित्र
पुणे व गुडगावमधील गुंतवणुकीमुळे ट्रम्प कुटुंबाचे भारतीय नेत्यांशी चांगले संबंध आहेत. या नेत्यांमध्ये भाजप व काँग्रेसच्या नेत्यांचा समावेश आहे. वृत्तामध्ये त्यांची नावे दिली नाहीत.
पुढील स्‍लाइडवर वाचा, महाराष्ट्रात चौकशी सुरू
बातम्या आणखी आहेत...