आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोनाल्ड ट्रम्पच्या वाटेत आता पुतीनरूपी अडथळ्यांचे काटे, निवडणुकीदरम्यानचा हँकिंग मुद्दा तापला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्या बैठका पहाटेपर्यंत सुरू राहतात. ते अनेक ट्विटर अकाउंट वापरतात. त्यामुळे ४ जानेवारी २०१७ रोजी सकाळी मास्कोमध्ये त्यांनी अमेरिकेच्या नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट पाहिले असण्याची शक्यता आहे. यात वर्ष २०१६ मधील राष्ट्राध्यक्ष निवडणुकांत रशियाच्या हस्तक्षेपावर अमेरिकेच्या गुप्तहेर संस्थेने जारी केलेल्या अहवालास उशीर झाल्याविषयी तक्रार केलेली होती. ट्रम्प यांचे म्हणणे होते की, तथाकथित रशियन हॅकिंगवर अहवाल देण्याची मुदत आता शुक्रवारपर्यंत वाढवली आहे. कदाचित याप्रकरणी अधिक वेळ लागू शकतो. हे विचित्र आहे. 
 
तोपर्यंत अतिगोपनीय अहवाल तयार झाला होता. तपास करणाऱ्या प्रमुख हेरगिरी विश्लेषकांच्या कार्यालयात तो होता. या अहवालाचे निष्कर्ष पुतीन आणि ट्रम्प यांनाही पसंत असण्याची शक्यता नव्हती. वरिष्ठ हेर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनुसार दस्तएेवजात अमेरिकन हेर समुदाय, राष्ट्रीय सुरक्षा विभाग, फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आणि होमलँड सिक्युरिटी विभागाच्या प्रमुखांचे मत आहे की पुतीन यांनी नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुकांना प्रभावित करण्यासाठी सुनियोजित अभियान चालवले होते, असे अनेक अमेरिकनांचे मत आहे.  

ट्रम्प यांच्या रूपात पुतीन यांना असा राष्ट्राध्यक्ष मिळाला आहे जो नव्या भागीदारीसाठी नवे व्यवहार स्थापित करेल. तरीही पुतीन अद्याप निश्चिंत नाहीत. ट्रम्प माॅस्कोविषयी मवाळ धोरण दाखवू पाहतात तर मध्यपूर्व आणि अण्वस्त्रांच्या बाबतीत ते कडक धोरण अवलंबत आहेत. 

डिसेंबरच्या अंतिम आठवड्यात अमेरिकेने हॅकिंगसाठी तीन रशियन कंपन्यांची नावे प्रसारित केली होती. यात सर्वात मोठी एसटीएलसी-स्पेशल टेक्नॉलॉजी सेंटर सेंट पीटर्सबर्ग स्थित स्वतंत्र कंपनी आहे. ही रशियन हेरांसाठी काम करते. एसटीएलसीने रशियन सैनिक हेर सेवा जीआरयूला सिग्नल व इतर माहिती दिली. दुसरी एक टेक्निकल फर्म जोरसिक्युरिटीने जीआरयूसाठी रिसर्च केले. तिसरी फर्म एनोपोकसीने जीआरयूला प्रशिक्षण दिले. 
 
ट्रम्प यांच्या विजयानंतर ६ आठवड्यांनी राष्ट्राध्यक्ष आेबामांनी पुतीनविरुद्ध धोरण अवलंबण्यास मंजुरी दिली. ३५ रशियन अधिकाऱ्यांना हद्दपार केले. रशियानेही प्रत्युत्तर दिले. या घोषणेनंतर एक दिवसाने पुतिन म्हणाले, रशिया-अमेरिका संबंधावरील आमची भावी धोरणे नव्या प्रशासनाच्या धोरणावर अवलंबून राहतील. काही बाबतीत रशिया कमकुवत आहे. दोन वर्षांपासून आर्थिक मंदी आहे. तेल उत्पादनातील घट अर्थव्यवस्थेवर परिणाम करत आहे. त्यामुळे युरोपीय बाजारावर अवलंबून राहावे लागेल. तिथेही निर्बंध लागू आहेत. यूक्रेनमध्ये रशियाच्या हस्तक्षेपानंतर अमेरिका, जर्मनी व ब्रिटनने पूर्व सोव्हिएत गटातील देशांत सैन्य तैनात केले.  

रिपब्लिकन पार्टीचे  रशियन संबंधाचे विशेषज्ञ ग्राहम म्हणतात, पुतिन यांना मित्रांची गरज आहे. रशियाने चीनशी हातमिळवणी केली. मात्र व्यापारात चीन मात देत आहे. पुतिन यांनी द. कोरिया, व्हिएतनामशी व्यापार वाढीचा प्रयत्न केला. मात्र यश नाही. ग्राहमच्या मते, त्यांना अमेरिका व युरोपची गरज आहे. पुतिन-ट्रम्प सोबत राहू नयेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विशेषज्ञ सांगतात की पहिल्या दोन भेटींनंतर ते परस्परांचा द्वेष करत आहेत.  
 
बातम्या आणखी आहेत...