आंतरराष्ट्रीय डेस्क - उत्तर कोरियाचा सनकी हुकूमशहा किम जोंग उन अमेरिकेला नेहमी अणुयुद्धाची धमकी देत आला आहे. याशिवाय रशिया, इराण आणि चीनशीही अमेरिकेच्या कुरबुरी जगजाहीर आहेत. यावरून नेहमीच तिसऱ्या जागतिक महायुद्धाची भीती व्यक्त केली जाते. या महायुद्धात अणुबॉम्बचा वापर होऊ शकतो. परंतु, अमेरिकेने या अणुयुद्धापासून बचावासाठी देशाचे मोठे नेते, लष्करी अधिकारी यांच्या सुरक्षेसाठी देशभरात ठिकठिकाणी गुप्त बंकर्स बांधलेले आहेत. हे बंकर्स अणुयुद्धात या सर्वांचा बचाव करतील.
डोंगराच्या आत 1 किमीपर्यंत विस्तार आहे बंकरचा...
- USचे बांधकाम तज्ज्ञ गेरेट ग्राफ यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत कोलोरॅडोमधील माउंटेन कॉम्प्लेक्सबाबत सांगण्यात आले आहे.
- तथापि, कोलोरॅडोमध्ये हे बंकर गुप्त ठिकाणी आहे. याची निर्मिती इ.स. 1948मध्ये करण्यात आली होती.
- डोंगराच्या 50 मीटर खाली असलेला हा बंकर 1 किमी परिसरात विस्तारलेला आहे आणि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे.
- यात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधाही आहेत तसेच तब्बल 1400 लोक यात अनेक महिने आराम करू शकतात.
- गरज भासल्यास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि महत्त्वाचे नेते, लष्करी अधिकारी यांना येथे राहता यावे यासाठी 1991मध्ये याचे आधुनिकीकरण करण्यात आले.
- आधुनिकीकरणासाठी अमेरिकी शासनाने तब्बल 4000 कोटी रुपये खर्च केले. यानंतर याची क्षमता 5000 लोकांची झाली आहे.
- हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, येथे ज्या कुणाला प्रवेश मिळतो, त्याला त्याच्या कुटुंबाच्या कुठल्याही सदस्याला येथे आणता येत नाही.
व्हर्जिनियातही बनवला आहे खास बंकर
- गुप्तचरांच्या माहितीनुसार, असाच एक बंकर व्हर्जिनियाच्या पीटर्स माउंटेनच्या खालीही बनवण्यात आला आहे.
- या बंकरलाही प्रमुख नेते, अधिकाऱ्यांच्या राहण्यासाठी सुसज्ज करण्यात आले आहे.
व्हाइट हाऊसखालीही आहे बंकर?
- एका प्रसिद्ध विदेशी दैनिकाच्या वृत्तानुसार, अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान व्हाइट हाऊसच्या खालीही असाच एक अत्याधुनिक बंकर बनवण्यात आला आहे.
- याच वृत्तानुसार हा बंकर दुसऱ्या महायुद्धादरम्यान तत्कालिन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी बांधला होता.
पुढच्या स्लाइड्समधील फोटोंतून पाहा, आतून कसे दिसते हे बंकर...