आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बस-टँकरची टक्कर, 36 जण ठार; मेक्सिकोच्या सीमेवर चकमक, 11 मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कंदहार- अफगाणिस्तानातबस तेल टँकर यांच्यात टक्कर होऊन ३६ जण ठार झाले. दक्षिणेकडील झाबूल प्रांतात रविवारी ही घटना घडली.

कंदहारहून काबूलकडे जाणारी बस टँकर यांच्यात काबूल-कंदहार महामार्गावर हा अपघात झाला. त्यात ३५ ठार तर २० जण जखमी झाले. अपघात एवढा भीषण होता की त्यात अनेक महिला, मुले होरपळली गेली. घटनास्थळी काही मृतदेहांची आेळखही पटत नाही. त्यांचा कोळसा झाला आहे. जखमींना कालात येथील रुग्णालयात उपचारार्थ पाठवण्यात आले आहे, अशी माहिती झाबूल प्रांताचे पोलिस उपप्रमुख गुलाम जिलानी फराही यांनी दिली. जगातील सर्वात वाईट रस्ते असलेल्या देशांमध्ये अफगाणिस्तानचा समावेश होताे. त्याशिवाय वाहतूक नियमांचा बोजवाराही उडालेला दिसतो. दरम्यान, हिंदू कुश या डोंगराळ भागातील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी जागतिक बँकेने अफगाणिस्तानला २५० दशलक्ष डॉलरचा निधी देऊ केला होता.

मे महिन्यातील घटनेची आठवण ताजी
अफगाणिस्तानात याच वर्षी मे महिन्यात बस टँकर यांच्यातील अपघातात ७३ जणांचा मृत्यू झाला होता. पूर्वेकडील गझनी प्रांतातील रस्ते तुलनेने अधिक जीवघेणे ठरले असल्याचे अनेक घटनांतून दिसून आले आहे. एप्रिल २०१३ मध्येही मोठा अपघात झाला होता. कंदहारमधील एका घटनेत ४५ जण मृत्युमुखी पडले होते.

सिउडा व्हिक्टोरिया - अमलीपदार्थ तस्करी करणारी टोळी सुरक्षा दल यांच्यातील धुमश्चक्रीत किमान ११ जण ठार झाल्याची घटना मेक्सिकोच्या सीमेवर घडली. नुइवो लारेडो शहरात ही चकमक उडाली होती. अमेरिका मेक्सिको यांच्यात तस्करी होते. हा मार्ग दाेन्ही देशांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. उभय देशांतील व्यापार तसेच आयात-निर्यातीसाठी हा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे हा भाग संवेदनशील आहे.
बातम्या आणखी आहेत...