आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडोनेशियातील भूकंपाच्या दुसऱ्या दिवशीही मदतकार्य सुरूच,मृतांची संख्या 102, 700 च्या वर जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जकार्ता - इंडोनेशियातील भूकंपाच्या दुसऱ्या दिवशीही मदतकार्य सुरू होते. घटनास्थळी इमारतीचे मोठे ढिगारे असून मृतांची संख्या १०२ वर पोहोचली आहे. ७०० वर जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. बचाव पथकात दीड हजारावर स्वयंसेवक आहेत. बुधवारी भूकंपाचा तीव्र धक्का बसला होता. रिश्टर स्केलवर त्याची ६.५ अशी तीव्रता नोंदवण्यात आली. भूकंपाचे नंतरही अनेक धक्के जाणवले, परंतु त्यात काही जीवित हानीचे वृत्त नाही.

२६ डिसेंबर २००४ मध्येही मृत्यूचे झाले हाेते तांडव
अॅसेच भागात २६ डिसेंबर २००४ मध्ये भूकंपाचा धक्का बसला होता. त्या घटनेचा इंडोनेशियाच नव्हे तर जगालाही विसर पडलेला नसावा. भूकंपाच्या धक्क्याने मृत्यूचे तांडव पाहायला मिळाले होते. त्यात १ लाखाहून अधिक जणांचा मृत्यू झाला होता.

सुनामीचा धोका नाही
भूकंपानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र सुनामीचा धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. असंख्य लोकांत घबराट असून पहाटेच्या वेळी घडलेल्या घटनेने काही नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बांदा आसेहमध्ये इमारतींचे मोठे नुकसान..
- लोकल मीडियाच्या मते, भूकंपामुळे बांदा आसेहमध्ये इमारतींना सर्वाधिक नुकसान सहन झाले आहे.
- याठिकाणी किनारी भागातील अनेक परिसरात इमारती कोसळल्या.
- ढिगाऱ्यांमध्ये अजूनही काही लोक दबलेले असण्याची शक्यता आहे.
- या भागातील डिस्ट्रिक्ट चीफ मुलयादी म्हणाले कहा, आतापर्यंत 18 जणांचे मृतदेह हाती आले आहेत. अनेक लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो.
- मृतांमध्ये सात लहान मुलांचा समावेश आहे.
लोक करत होते नमाजची तयारी
- जेव्बहा भूकंप आला त्यावेळी लोक सकाळी नमाजची तयारी करत होते.
- पिडी जयामध्ये अनेक मशिदींची पडझड झाली आहे.
- मात्र, सुनामीचा अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...