आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO ताशी ३३० किमीच्या वेगाने धडक, कारचा चुराडा पण ड्रायव्हर वाचला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्लोरिडा - अमेरिकेच्या डेटोनामध्ये नास्कर कोक झिरो 400 स्पर्धेदरम्यान ट्रॅकवर एक मोठा अपघात झाला. फिनिश लाइन पार केल्यानंतर डॅनी हॅमलिनच्या कारने अस्टिन डिलनच्या कारला धडक दिली. त्यामुळे डिलनच्या कारवरील नियंत्रण सुटले आणि ही कार संरक्षक जाळीला धडकली. त्यात कारचा चुराडा झाला आणि कारने पेटही घेतला. कारचा वेग ताशी 330 किमी होता. अपघातात 12 कारचे नुकसान झाले. मात्र त्यात कोणत्याही कारचा चालक जखमी झाला नाही. कारचे तुकडे उडून लागल्याने तीन प्रेक्षक जखमी झाले.

केवळ हाताला खरचटले
या अपघातानंतर अस्टीन जिवंत बाहेर येईल की नाही, अशी शंका उपस्थित प्रेक्षकांना वाटू लागली होती. पण कार जमिनीवर कोसळल्यानंतर अस्टीन स्वतःच कारमधून बाहेर पडला. लगेचच मेडिकल टीमही याठिकाणी पोहोचली. अस्टीनने उपस्थित प्रेक्षकांना हात दाखवत आपण ठिक असल्याचे संकेत दिले. त्यांनंतर त्याला उपचारासाठी नेण्यात आले. त्याच्या हातावर केवळ खरचटले होते. त्यानंतर अस्टीटनने ट्विटद्वारे सर्वांचे आभार मानले. माझ्या मदतीसाठी धावलेल्या सर्वांचे आभार, असे तो ट्विटमध्ये म्हणाला.

पुढील स्लाइड्सवर पाहा, या घटनेचे PHOTOS