आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालकरहित कारने पार केले ५,५०० किमी अंतर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - जगातील पहिल्या चालकरहित कारने सुमारे ५ हजार ५०० किलोमीटर अंतर पार करून यशस्वी चाचणी दिली आहे. ब्रिटनमधील वाहन निर्माता कंपनी डेल्फीच्या दाव्यानुसार, या कारची चाचणी अमेरिकेत घेण्यात आली. अमेरिकेतील १५ राज्यांतून प्रवास करत या कारने ५ हजार ५०० किलोमीटरचा पल्ला गाठला.

चाचणीच्या वेळी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अभियंता कारमध्ये बसून होते. मात्र, ९९ टक्के प्रवास चालकरहितच झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. कारमध्ये दहा रडार, सहा लायडर सेन्सर, लोकलायझेशन सिस्टिम आणि अन्य अत्याधुनिक सॉफ्टवेअर्स बसवण्यात आले आहेत.