आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानच्या पंतप्रधान कार्यालयावर आढळले ड्रोन, कोणतीही हानी नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो - जपानच्या पंतप्रधान कार्यालयावर बुधवारी सकाळी एक छोटे ड्रोन सापडले. यात एक छोटा कॅमेरा, पाण्याची बाटली आणि रेडिआेअॅक्टिव्ह घटक असल्याचे आढळले. या ड्रोनमध्ये कोणतीही विस्फोटक सामग्री नव्हती. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे सध्या अशिया-आफ्रिका संमेलनासाठी इंडोनेशियामध्ये आहेत. हे ड्रोन पाचमजली इमारतीवर कसे पोहोचले, ही कृती कोणाची असू शकते याचा सध्या तपास सुरू आहे. यावर पंतप्रधान कार्यालयातून कोणतेही वक्तव्य प्रसारित करण्यात आले नाही.

काेर्टाने बंदी फेटाळली
जपानच्या एका न्यायालयाने बुधवारी अणु प्रकल्प सुरू करण्यास मंजुरी दिली. २०११ मध्ये फुकुशिमा अणुभट्टीतून झालेल्या किरणोत्सर्गाच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, असा निर्वाळाही न्यायालयाने दिला आहे. वर्तमान स्थितीत किरणोत्सर्गाचा धोका नसल्याची टिप्पणी न्यायालयाने केली. या संवेदनशील निर्णयानंतर पंतप्रधानांच्या कार्यालयावर ड्रोन आढळले.
‘व्हाइट हाऊस’मध्येही
जानेवारीत एक छोटे ड्रोन व्हाइट हाऊसमध्येही सापडले होते. अमेरिकेत सुरक्षा नियंत्रण व्यवस्थेच्या अटी-नियमांत पारदर्शकता आणण्याची मागणी त्या वेळी करण्यात आली होती.