आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Disrupt Finances Of Drug terror Nexus, Arun Jaitley Tells UN General Assembly

अतिरेकी, तस्करांची आर्थिक रसद तोडा, जेटलींचे आंतरराष्ट्रीय समुदायास आवाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्र - दहशतवादी आणि तस्कर यांची आर्थिक रसद तोडली पाहिजे. त्यानंतर जगभरातील शांतता, सुरक्षितता आणि स्थैर्याची ग्वाही देता येऊ शकेल. त्यासाठी आर्थिक पुरवठा रोखण्यासाठी सर्व देशांनी पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले आहे.

सध्याच्या नागरी समाजाला दहशतवाद हाच सर्वात मोठा धोका ठरू पाहतोय. दहशतवादाला कोणत्याही मर्यादा नाहीत. त्यात वेगवेगळ्या खंडांत राहणाऱ्या निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. हे लक्षात घेऊन दहशतवादी आणि तस्करांच्या नाड्या आवळल्या पाहिजेत. जेणेकरून प्रदेशात शांतता, स्थैर्य आणि सुरक्षिततेची हमी देता येऊ शकेल, असे जेटली म्हणाले. बुधवारी संयुक्त राष्ट्राच्या ३० व्या आमसभेत ते बोलत होते. अशा प्रकारच्या सैतानांच्या विरोधातील लढाई आणखी तीव्र करण्याची वेळ आली आहे. दहशतवाद्यांबरोबर जगाच्या कानाकोपऱ्यात वाढत चाललेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. परंतु या गुन्हेगारी टोळ्या तसेच दहशतवादी संघटनांना नेस्तनाबूत करण्यासाठी त्यांना आर्थिक पातळीवर कमकुवत करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. जागतिक पातळीवर अमली पदार्थाच्या तस्करीची मोठी समस्या आहे. परंतु २०३० पर्यंत विकासाची विषयपत्रिका प्रत्यक्षात उतरावी, असे वाटत असल्यास सर्व देशांनी एकजुटीने या समस्येशी लढले पाहिजे. त्याचे पुढचे पाऊल म्हणून अशा संघटनांच्या आर्थिक नाड्या आवळण्याची वेळ आली आहे. त्यासाठी द्विपक्षीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय अशा सर्व पातळ्यांवर एकत्र यावे लागेल. संवाद, सहकार्य वाढवावे लागेल.

आंतरराष्ट्रीय समुदायाने आतापर्यंत तीन संमेलनात काही ठराव स्वीकारले होते. त्यात या समस्यांवर उपाय शोधण्याचे प्रयत्न झाले. त्यात काही अंशी यश निश्चित आले आहे. परंतु आता अधिक व्यापक पातळीवर लढण्याची वेळ आली आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, तीनदिवसीय बैठक... दक्षिण अाशिया समन्वय केंद्र