आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Drunken Citizens Lost Their Senses In UK On New Year Celebration

New Year ला ब्रिटनच्या रस्त्यांवर मद्यधुंद तरुणाईचा धांगडधिंगा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेल्स टाऊनमध्ये रस्त्यावर झोपलेली महिला... - Divya Marathi
वेल्स टाऊनमध्ये रस्त्यावर झोपलेली महिला...
लंडन - जगभरात मोठ्या उत्साहामध्ये नव्या वर्षाचे स्वागत करण्यात आले. ब्रिटनमध्ये मात्र रस्त्यांवर सेलिब्रेशनदरम्यान चांगलाच गोंधळ झाला. याठिकाणी मद्यधुंद तरुणांनी चांगलाच गदारोळ घातला. कोणी पोलिसांच्या कारला हग करत असल्याचे पाहायला मिळाले तर कोणी पोलिसांच्या कारलाच मिठी मारत होतं. एकट्या लंडनमध्ये पोलिसांनी गदारोळ करणाऱ्या 48 जणांना अटक केली.

8 तासांत 1,629 कॉल...
- लंडनच्या वेस्ट मिडलँड अँब्युलन्स सर्व्हीसने मोठ्या संख्येत क्रू मेंबर्स तैनात केले होते.
- त्यांना आठ तासांमध्ये 1,629 इमर्जंसी कॉलवर काम करावे लागले.
- लंडन पोलिसांनी वेग वेगळ्या प्रकरणांमध्ये 48 जणांना अटक केली.
- ब्रिटनच्या रस्त्यांची अवस्था ख्रिसमसपूर्वी येणाऱ्या 'ब्लॅक आय फ्रायडे' सारखीच होती.
- प्लेमाउथ सिटीमध्ये मध्यरात्रीपर्यंत पोलिसांचे सेल भरलेले होते.
- वेल्समध्ये अॅक्सिडेंट आणि इमर्जंसी वॉर्ड पूर्ण रात्रभर उघडे राहतात.

पुढील स्लाइड्सवर पाहा, ब्रिटनमध्ये नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान तरुणांनी घातलेला धिंगाणा...