आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबईमध्‍ये रमजानच्‍या काळातही मिळेल मद्य, पर्यटकांमुळे नियमात केलाय बदल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई : रमजानच्या महिन्यात मुस्लिम देशांमध्ये मद्य प्राशन निषिद्ध असतेच. शिवाय हॉटेलमध्ये खाणेही योग्य मानले जात नाही. जवळपास सर्व हॉटेल्स बंद असतात. या नियमांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य मानले जाते. मात्र यंदा दुबईमध्ये या सर्व नियमांतून सूट देण्यात आली आहे. पर्यटकांचा राबता या शहरात नेहमी असतो. पर्यटनातून आणि मद्यविक्रीतून मिळणारा पैसा दुबई प्रशासनासाठी किती महत्त्वाचा असतो हे यावरून दिसून येते.

दुबईच्या पर्यटन आणि वाणिज्य विभागाने सांगितले की, जगात प्रवास करणाऱ्या पर्यटकांसाठी दुबई महत्त्वाचे स्थानक आहे. पर्यटकांमध्ये बहुतांश लोक मुस्लिमेतर असतात. त्यांना असुविधा होऊ नये यासाठी नियमात बदल केला आहे. कठोर नियमांमुळे पर्यटकांचा आेघ कमी होऊ नये यासाठीदेखील नियम बदलणे आवश्यक असल्याचे स्पष्टीकरण संबंधितांनी दिले. सर्व परदेशी पर्यटकांना सांगितले जात आहे की रमजानच्या नियमांचा त्यांनी आदर राखावा. रमजानच्या महिन्यात अंदाजे १० लाख पर्यटक येण्याची शक्यता वर्तवली आहे.

दरम्यान वर्षानुवर्षे लागू असलेल्या नियमाला याच वर्षी का बदलण्यात आले याविषयी प्रशासनाने काहीच भाष्य केले नाही. दरम्यान रमजानच्या पूर्वी दुबई पर्यटन विभागाने आदेश जारी केला. यानुसार हॉटेलमधील बार आणि नाइटक्लब नित्याप्रमाणे सुरू राहतील. हॉटेलच्या आत, विमानतळ आणि त्याच्याशी संलग्न हॉटेलच्या आत मद्य दिले जाईल.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटो...
बातम्या आणखी आहेत...