आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dubai Rulers Eldest Son Sheikh Rashid Dies Of Heart Attack

सर्वात सेक्सी पुरुषाचा किताब मिळवलेल्या दुबईच्या पंतप्रधानाच्या मुलाचे निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - शेख राशिद - Divya Marathi
फाइल फोटो - शेख राशिद
दुबई - दुबईचे पंतप्रधान आणि शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांचा मोठा मुलगा शेख राशिद याचे शनिवारी ह्रदयविकाराचा झटक्याने निधन झाले. तो 34 वर्षांचा होता. शेख राशिदच्या निधनानंतर दुबईत तीन दिवसांचा दुखवटा जाहिर करण्यात आला आहे. या दरम्यान संयुक्त अरब अमिरातचा (यूएई) झेंडा अर्ध्यावर ठेवण्यात येणार आहे. 2010 मध्ये झालेल्या सर्वेक्षणात सर्वात सेक्सी पुरुषांमध्ये शेख राशिदचा समावेश होता. 2011 मध्ये फोर्ब्सच्या 20 सर्वात हॉटेस्ट यंग रॉयल्सच्या यादीत तो होता. त्याशिवाय 2006 मध्ये दोहा येथे झालेल्या एशियन गेम्समध्ये त्याने दोन गोल्ड मेडल जिंकले होते.
शेख राशिद संबंधीत थोडक्यात माहिती

>> पूर्ण नाव - शेख राशिद बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम

>> यूएईचे उपाध्यक्ष आणि दुबईचे पंतप्रधान आणि शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम हा त्यांच्या 22 मुलांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा होता.

>> दुबईतील शाळेतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर ब्रिटनमधील सेंडहर्स्ट मिलिटरी अकॅडमी येथून ग्रॅज्यूएशन पूर्ण केले.

>> जानेवारी 2008 मध्ये त्यांना यूएई ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष करण्यात आले होते. 2010 मध्ये काम जास्त असल्याचे कारण सांगून राजीनामा दिला होता.

>> शेख राशिद अनेक कंपन्यांचे मालक आणि को-ओनर होते. त्याती निवडक कंपन्या, दुबई होल्डिंग, जबील रेसिंग इंटरनॅशनल, युनायटेड होल्डिंग ग्रुप.

>> शेख राशिद उत्तर अॅथलिट होता. त्याने दोहा एशियन गेम्समध्ये अँन्डुरन्स रेसिंगमध्ये दोन गोल्ड पटकावले होते.

>> त्याला फुटबॉलची देखील आवड होती. त्याच्या आवडीचा संघ मॅनचेस्टर यूनायटेड होता.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, शेख राशिदचे निवडक फोटोज..