आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पर्यटकांसाठी वर्तुळाकार इंटरचेंजची खास सुविधा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेनंतर आता दुबईमध्येही व्हर्लपूल इंटरचेंजच्या सुंदर रचना पाहायला मिळत आहेत. यात दोन किंवा तीन महामार्गांची वर्तुळाकार रचना केलेली असते. अमेरिकेत अशा रचना सर्वाधिक आहेत. २००६ मध्ये दुबईत हा इंटरचेंज बनवण्यात आला. विशेष म्हणजे यात तीन महामार्गांचा समावेश असून या रचनेमुळे प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेतही कपात झाली आहे. तसेच सभोवताली लहान-मोठे बगिचे विकसित करण्यात आले आहेत. ते सर्वांसाठी खुले आहेत. इथे अनेक दुर्मिळ फुलझाडांच्या प्रजाती आढळतात. त्यामुळे त्यांना ‘मिरॅकल गार्डन’देखील म्हणतात. १२ लेनच्या इंटरचेंजवर कार धावत असतानाही नागरिकांना त्याखाली असलेल्या बगिचांमध्ये फिरता येते.
} विदेशी पर्यटकांसाठी सोयीस्कर प्रवास हा दुबई मेट्रोचा उद्देश होता. या इंटरचेंजच्या बांधणीमागेदेखील हाच उद्देश आहे. बुर्ज खलिफा इमारतीसाठी प्रसिद्ध असलेल्या दुबईत अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वास्तू उभ्या राहत आहेत. }imgur.com
बातम्या आणखी आहेत...