आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीयामुळे मोस्ट वाँटेड अतिरेकी जेरबंद, शोधपथकात होते १ हजार पोलिस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - मी लॅपटॉपवर टीव्ही वाहिन्यांच्या बातम्या पाहत होतो. तेव्हाच माझ्या बारच्या दरवाजात मद्यधुंद तरुण पडून आराम करत असल्याचे मला दिसले. मात्र बातम्यांमध्ये ‘वाँटेड दहशतवादी’ म्हणून ज्याचे छायाचित्र झळकत होते ती हीच व्यक्ती असल्याचे मला दिसून आले. न्यूयॉर्क, न्यूजर्सी बॉम्ब स्फोटातील वाँटेड दहशतवादी अहमद खान रहामी आपल्या दारात पडलाय हे ध्यानात येताच पोलिसांना त्याची सूचना दिली. पोलिस पोहाेचल्याची चाहूल लागताच रहामीने हँडगन काढली व एका अधिकाऱ्यावर त्याने गोळीबार केला. तिथून पळ काढण्याच्या तो तयारीत होता. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. पोलिसांच्या गाडीवर त्याने गोळ्या झाडल्या. पोलिसांनी त्याच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला व त्याला पकडले. हा घटनाक्रम हरिंदर बँस यांनी सांगितला. लिंडन येथे त्यांच्या मालकीचा बार आहे. दहशतवाद्याची सूचना दिल्याने अमेरिकन लोकांच्या नजरेत ते हीरो झाले.

भारतवंशीय अमेरिकन अॅटर्नी रवी बतरा यांनी सांगितले की बँस यांनी नागरिकतेची शपथ खऱ्या अर्थाने निभावली. त्यांच्या हिमतीमुळे दहशतवादी पकडला गेला. नॅशनल शीख कँपेनमध्येदेखील बँस यांच्या धाडसाची प्रशंसा करण्यात आली. संयुक्त राष्ट्र महासभेसाठी जगभरातील नेते न्यूयॉर्कमध्ये येणार होते. त्याच्या आदल्या दिवशीच हे स्फोट झाले होते. त्यात २९ लोक जखमी झाले.

रहामी (२८) हा अफगाणवंशीय आहे. अमेरिकन संरक्षण विभागाने त्याला ‘सशस्त्र व मोस्ट वाँटेड दहशतवादी’ म्हणून जाहीर केले होते. १० जागी बॉम्ब लावल्याचा त्याच्यावर आरोप आहे. यातील २ बॉम्बचा स्फोट झाला. १ हजार पोलिस त्याच्या शोधासाठी नियुक्त केले होते.
युनियन काउंटी अभियोजक ग्रेस एच. पार्क यांनी सांगितले की न्यूजर्सीमध्ये रहामीच्या विरुद्ध एका विधी अधिकाऱ्याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलाय. रहामीने अवैध मार्गाने शस्त्र खरेदी केल्याचेही सिद्ध झाले. न्यूयॉर्क व न्यूजर्सीच्या सागरी किनाऱ्यावर शनिवारी झालेल्या स्फोटांच्या कटातही तो संशयित आहे. न्यूजर्सीतील एलिझाबेथ येथे रविवारी रात्री पाइप बॉम्ब आढळले. यातही त्याचा हात असल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे.
छायाचित्र: हरिंदर बैंस
बातम्या आणखी आहेत...