आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंकी सेल्फी खटला संपुष्टात, भविष्यात हाेणारी 25 टक्के कमाई छायाचित्रकार माकडास देणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅन फ्रान्सिस्को- कॅमेरा दिसल्यावर अनाहूतपणे सेल्फीच्या प्रेमात पडलेल्या इंडोनेशियाच्या नारुटोच्या (माकड) सेल्फीचा खटला बंद झाला आहे. कॅमेऱ्यासमोर दात काढून डोळे विस्फारणारा नारुटो खटला हरला अाहे. छायाचित्रकार डेव्हिड जे. स्लेटर यांनी हा खटला जिंकला आहे. छायाचित्रकार डेव्हिड स्लेटर यांना कॉपीराइट कायद्याअंतर्गत न्यायालयात खेचण्यात आले होते. माकडाने कॅमेऱ्याने स्वत:हून छायाचित्रे काढली होती, या आधारावर मंकी सेल्फी खटला चर्चेत आला होता. स्लेटर यांनी अनेक ठिकाणी आपल्या नावाने छायाचित्राचा वापर केल्यामुळे प्राण्यांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या पेटा या संस्थेने त्यास विरोध केला. दोन्ही पक्षांच्या वकिलांनी मंकी सेल्फीच्या कॉपीराइटवरून सॅन फ्रान्सिस्कोच्या कोर्टात तडजोड केली. स्लेटर व पेटाच्या वकिलांनी सांगितले की,  खटला इथेच संपवण्याची आमची इच्छा आहे. भविष्यात प्राण्यांसाठी एकत्र काम करत राहू. पेटाचे वकील म्हणाले, भविष्यात छायाचित्राद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नाचा २५ टक्के वाटा नारुटो व इंडोनेशियात आढळणाऱ्या दुर्मिळ मकाॅक प्रजातीच्या माकडाच्या सुरक्षेसाठी दान केला जाईल. पेटाने २०१५ मध्ये सेल्फी काढणाऱ्या मकॉक प्रजातीच्या माकडाऐवजी आपल्या नावाने मालकी हक्क दाखवल्यामुळे स्लेटरवर खटला गुदरण्यात आला होता. छायाचित्र माकडाने स्वत: काढले असल्यामुळे मिळणारे उत्पन्न माकडालाच मिळायला पाहिजे व त्याच्यावरच खर्च झाला पाहिजे, असा दावा केला. त्यावर यूएस डिस्ट्रिक्ट जज विल्यम ओरिक यांनी स्लेटर यांच्या बाजूने निकाल दिला.

नारुटोने २०११ मध्ये काढले डझनभर फोटो 
माकडाची ही सेल्फी २०११ ची आहे. ब्रिटन मॉनमाउथशरेचे रहिवासी वन्यजीव छायाचित्रकार डेव्हिड स्लेटर इंडोनेशियाला गेले होते. ते एका राष्ट्रीय उद्यानात दुर्मिळ प्राण्यांचे छायाचित्र काढण्याचा प्रयत्न करत होते. यादरम्यान ७ वर्षांच्या नारुटो स्लेटरचा कॅमेरा उचलून बटण दाबू लागला. डझनभराहून अधिक क्लिकमध्ये त्याने स्वत:चीही छायाचित्रे काढली होती. अमेरिकेतील मासिकाने ती प्रकाशित केल्यानंतर नारुटो चर्चेत आला.
बातम्या आणखी आहेत...