आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गद्दाफीपासून ते बराक ओबामांपर्यंत, येथे प्रत्येकाचे आहेत DUPLICATE

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गद्दाफी आणि त्याचा डुप्लिकेट अली माजिद अल अनडैलस. - Divya Marathi
गद्दाफी आणि त्याचा डुप्लिकेट अली माजिद अल अनडैलस.
ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेयर यांनी नुकताच खुलासा केला आहे की, त्यांनी लिबियाचा हुकूमशहा कर्नल मुअम्मर अल गद्दाफीच्या मृत्यूपूर्वी त्याला देश सोडून जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्याचवेळी गद्दाफीला वाचवण्यासाठी आपण तसे केले नव्हते असे बचावात्मक स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे.

फोनवर दिला होता सल्ला
- ब्लेयर यांच्या मते 2011 मध्ये त्यांनी गद्दाफीच्या शासन पतनाच्या 24 तासांपूर्वी तीन वेळा फोनवरून त्याला देश सोडून जाण्याचा सल्ला दिला होता.
- ब्लेयर म्हणाले की, त्यांनी लिबियामधील रक्तपात बंद करण्याच्या दृष्टीने हा सल्ला दिला होता. मी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत नव्हतो. तसेच त्यासाठी पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांची परवानगी घेतली होती.
- गद्दाफी अखेरपर्यंत लिबिया सोडून पळाला नव्हता. बंडखोरांनी त्याची हत्या केली होती.

गद्दाफीशी संबंधांच्या प्रश्नांवर देत होते उत्तरे
- लेबर पार्टीचे माजी नेते टोनी ब्लेयर ब्रिटिश संसदेच्या फॉरेन रिलेशन्स कमेटीच्या प्रश्नांना उत्तरे देत होते. त्यांना 2004 पासून 2011 दरम्यान कर्नल गद्दाफीबरोबर असलेल्या संबंधांबाबत प्रश्न विचारण्यात आले.
- 2004 मध्ये कर्नल गद्दाफी यांनी दहशतवादप्रकरणी अनेक वर्षे जगापासून लांब राहिलेल्या लिबियाला पुन्हा जगाच्या जवळ आणले होते. ब्लेयर यांनी 2007 मध्ये सत्ता सोडली होती. ते 2004 मध्ये वाळवंटात एका तंबूमध्ये गद्दाफींना भेटलेही होते.
- दोघांमध्ये 'डील इन द डेझर्ट' झाली होती. त्यानंतर गद्दाफी यांनी अणुबॉम्ब आणि रासायनिक शस्त्रे तयार करणे थांबवले होते. ब्लेयर यांनी गद्दाफी यांना लॉकर्बी हल्लेखोर अब्देल बसेत अली मुहम्मद अल मगरही याला सोडण्याचे आश्वासन दिले होते, याचे खंडनही केले होते.

गद्दाफीसोबत असायचा त्याचा डुप्लिकेट
गद्दाफी शत्रूंपासून बचाव व्हावा म्हणून डुप्लिकेटचा वापरही करायचा. त्याच्या मृत्यूच्या बातम्या आल्या त्यावेळीच त्याचा एक डुप्लिकेटही समोर आला होता. मीडिया रिपोर्टसनुसार ज्याला गद्दाफी समजून गोली घालण्यात आली होती, खरं तर तो त्याचा डुप्लिकेट अली माजीद अल अनडॅलस होता. अलीचा चेहरा गद्दाफीबरोबर एवढा मिळता जुळता होता की दोघांमध्ये खरा कोण हे ओळखणेही कठीण व्हायचे. अली सिर्ते येथील रहिवासी होता. जगातील अशाच काही मोठ्या नेत्यांच्या डुप्लिकेट्सबाबत जाणून घेऊयात.

पुढील स्लाइड्सवर वाचा, इतर नेत्यांच्या डुप्लिकेट्सबाबत...
बातम्या आणखी आहेत...