आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Durban Car Goes Through Roof Of Home In South Africa

दक्षिण आफ्रिका: छत तोडून घरात कार घुसली, छायाचित्रे झाली व्हायरल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डरबनमध्‍ये घराच्या छतात घुसली कार. - Divya Marathi
डरबनमध्‍ये घराच्या छतात घुसली कार.
डरबन - दक्षिण आफ्रिकेच्या डरबनमध्‍ये कार अपघाताचा एक वेगळा प्रकार समोर आला आहे. इमर्जेंसी सर्व्हिस फर्मनुसार कारचा चालक रस्ता चुकला आणि अनोळखी उंच रस्त्यावर निघाला. दरम्यान प्रचंड वेगामुळे कारवरील नियंत्रण सुटल्याने हवेत पलटून घरात घुसली. ही घटना गुरुवारी(ता.दोन) डरबनच्या क्वामाखुथा गावात घडली.

घटनेच्या वेळी घरमालक झोपला होता, अशी माहिती फर्मने दिली. अचानक झालेल्या घटनेने त्याने पळ काढला. आश्‍चर्याची बाब म्हणजे त्या घर मालकाला इजा झाली नाही. दुसरीकडे चालकही बचावला. इंटरनेटवर कार अपघाताचे छायाचित्रे येताच व्हायरल झाली आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, डरबनमध्ये झालेल्या कार अपघाताचे छायाचित्रे...