आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Durban Car Goes Through Roof Of Home In South Africa

द. अाफ्रिका : छप्पर तोडून घरात घुसली कार, PHOTOS झाले व्हायरल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डरबन - दक्षिण अाफ्रिकेच्या डर्बनमध्ये कार क्रॅशची एक अनोखी घटना घडल्याचे समोर आले आहे. याठिकाणी नियंत्रण सुटलेले एक कार थेट एका घराचे छप्पर तोडून आत घुसली. फर्म या इमर्जंसी सर्व्हीसने दिलेल्या माहितीनुसार कारचा ड्रायव्हर रस्ता विसरला होता. त्यामुळे तो नकळत चढ असलेल्या रस्त्यावर गेला. त्याचवेळी कारचा वेग वाढला आणि नियंत्रण सुटल्याने कार हवेत उडाली आणि एका घराच्या छतामध्ये जाऊन घुसली. ही दुर्घटना डर्बनच्या क्वामाखुथा येथे घडली.

या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या वेळी घराचा मालक घरामध्येच झोपलेला होता. अचानक झालेल्या या प्रकाराने तो दचकून उठला आणि थेट घराबाहेर धावला. सुदैवाने या घटनेत तो जखमी झाला नाही. ड्राइवरही चांगलाच नशीबवान ठरला. त्यालाही गंभीर जखमा झाल्या नाही. इंटरनेटवर अपघाताचे फोटो येताच ते व्हायरल झाले.

पुढील स्लाइड्वर पाहा, डर्बनमध्ये झालेल्या या कार अपघाताचे PHOTOS