आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्वे हे अमेरिकेतील सर्वात विध्वंसक चक्रीवादळ, ह्यूस्टन शहराची अशी लागली वाट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ह्यूस्टन एयरपोर्ट असे पाण्यात गेले आहे. - Divya Marathi
ह्यूस्टन एयरपोर्ट असे पाण्यात गेले आहे.
इंटरनॅशनल डेस्क- अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात जास्त पाऊस आणणारे चक्रीवादळ ‘हार्वे’ मुळे टेक्सासमध्ये दोन लाखांहून अधिक लोक बेघर झाले आहेत. चक्रीवादळ आणि महापूर यामुळे सर्वात जास्त नुकसान टेक्सास राज्यातील ह्यूस्टन शहराचे झाले आहे. तेथे आतापर्यंत एक लाखाहून अधिक लोकांना सुरक्षित स्थानी पोहचले आहे. शेजारील राज्यात पोहचले महापूराचे पाणी....
 
- टेक्सासनंतर हे वादळ बुधवारी लुईजाना राज्यात पोहचले. ज्यामुळे तेथे महापूर आला. 
- यूएस नॅशनल हेरिकेन सेंटरच्या माहितीनुसार, लुईजानात 35 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 17 लोक बेपत्ता आहेत. 
- लुईजानानंतर सर्वात जास्त धोका पोर्ट एर्थर शहराला आहे. कारण तुफान पावसाने पाणी ब्यूमोंटमधून पोर्ट एर्थरकडे वळू शकते. 
- अमेरिका देशातील सर्वात चौथे मोठे शहर ह्यूस्टनमध्ये रिकार्ड 30 इंच पाऊस झाला आहे. 
- वादळात पाच लोकांचा मृत्यू झाला आहे तर एक डझनहून अधिक लोक जखमी झाले आहेत. 
- ह्यूस्टनपासून 35 मैल लांब असलेल्या दक्षिण पश्चिम स्थित फोर्ट बेंड काउंटीतून 50,000 अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
- हार्वे हे चक्रीवादळ अमेरिकेतील मागील सहा दशकातील सर्वात मोठे वादळ ठरले आहे. वर्ष 2005 मध्ये कॅटरीना वादळाने 1,800 लोकांचा मृत्यू झाला होता.
 
अमेरिकेच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा पाऊस-
 
- अमेरिकेच्या टेक्सास आणि ह्युस्टन शहरात चक्रीवादळ हार्वेने उत्पात माजवला आहे. येथे ४ दिवसांत ५२ इंच पाऊस झाला. हा अमेरिकेच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा पाऊस ठरला. 
- १९५० मध्ये चक्रीवादळ हिक्की आले होते. त्या वेळी हवाईत असा पाऊस झाला होता. हार्वेमुळे अमेरिकी अर्थव्यवस्थेला ३ लाख कोटींचे नुकसान झाले आहे. ५ लाख कार पाण्यात बुडाल्या आहेत. 
- आतापर्यंत १८ जणांचा बळी गेला. मृतांत भारतीय विद्यार्थी निखिल भाटियाचा समावेश आहे. जयपूरचा निखिल टेक्सासच्या ए. अँड एम. विद्यापीठाचा विद्यार्थी होता.
 
३० हजार कोटींची देणगी-
 
- आतापर्यंत बचाव कार्यासाठी नागरिकांनी ३० हजार कोटींची देणगी दिली आहे. यात फेसबुक, गुगल, उद्योजक, धर्मादाय संस्था, हॉलीवूड व सामान्य नागरिकांचा समावेश आहे. एका गादी उत्पादकाने आपले शोरूम बचाव शिबिरासाठी दिले. यात अनेकांना आश्रय घेता येईल.
 
स्फोटाची शक्यता-
 
- येथील क्रॉसबी रासायनिक प्रकल्पात स्फोट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. आसपासच्या १.५ मैलापर्यंतचा परिसर रिकामा करून घेण्यात आला आहे. हवामानामुळे हेलिकॉप्टरचा वापर बचावकार्यासाठी करणे शक्य नाही.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, ह्यूस्टन शहराचे कसे झाले आहे हाल याचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...