आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेपाळला पुन्हा हादरे, ताज्या भूकंपात १००वर मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठमांडू - नेपाळ गुरुवारी भूकंपाच्या पाच धक्क्यांनी हादरले. ७.३ च्या भूकंपामुळे अगाेदरच धडकी भरलेले सामान्य नागरिक या नव्या धक्क्यांमुळे अधिकच धास्तावले आहेत. दरम्यान, ताज्या भूकंपातील मृतांची संख्या १०० हून अधिक झाली आहे.
नेपाळमधील प्रलयंकारी भूकंपानंतर सुरू असलेल्या मदतकार्यात व्यापक पातळीवर सक्रिय राहण्याचा संकल्प अमेरिकेने केला आहे. गुरुवारी कनिष्ठ सभागृहात यासंबंधीचे विधेयक सादर करण्यात आले. वरिष्ठ सभागृह काँग्रेसमध्ये यास अगोदरच मंजुरी मिळाली आहे. नैसर्गिक संकटात महिला आणि मुलींना वाचवण्यास प्राधान्य देण्यात येईल. दरम्यान, गेल्या महिन्यातील भूकंपात ८ हजारावर नागरिक ठार झाले होते.

दुसरीकडे काठमांडूच्या पूर्वेकडील डोलाखामध्ये अगोदरच्या भूकंपात ५१ जण ठार झाले होते. २५ एप्रिल रोजी पहिला भूकंप झाला होता.