आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Earth Quake Tourist Spots Totaly Vanished In Nepal

नेपाळची ओळखच जमीनदोस्त झाली, अनेक पर्यटन स्थळे होत्याची नव्हती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या भूकंपामुळे नेपाळ या देशाची जणू ओळखच नष्ट झाली अशी स्थिती निर्माण झाली आहे. याठिकाणी असलेली अनेक पर्यटनस्थळे पूर्णपणे जमिनदोस्त झाली आहेत. ही पर्यटनस्थळे नेपाळत्या उत्पन्नाचा एक प्रमुख भाग होती. त्यामुळे भूकंपामुळे झालेल्या नुकसानीबरोबरच आगामी काळात उत्पन्नाचा मोठा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात अशाच उध्वस्त झालेल्या पर्यटनस्थळांबाबत...
फोटो - धरहरा मिनार पूर्वीचा आणि भूकंपानंतरचा
नेपाळचा कुतुबमिनार कोसळला...
नेपाळचा कुतुबमिनार संबोधला जाणारा काठमांडूचा धरहरा मिनार शनिवारी भूकंपात उद्ध्वस्त झाला. यात ४०० लोक गाडले गेल्याची भीती आहे. जाणून घेऊयात या मिनाराबाबत काही महत्त्वाची माहिती...
- २३७ फूट उंची आहे दिल्लीच्या कुतुबमिनारची.
- २०३ फूट उंची या मिनारची
- २१३ वर्तुळाकार जिने यात होते.
- १८३२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान भीमसेन थापा यांच्या कार्यकाळात मिनार बांधण्यात आला.
- १९९३ च्या भूकंपात ११ मजली इमारतीचे सात मजले जमीनदोस्त झाले होते.
- ०९ मजल्यांचे पुन्हा बांधकाम करण्यात आले होते.
- २००५ मध्ये पर्यटकांसाठी ते खुले करण्यात आले होते.
पुढील स्लाइडवर जाणून घ्या, अशाच काही पर्यटन स्थळांबाबत...