आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पपुआ न्यू गिनीमध्ये भूकंप, सुनामीचा धोका टळला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी- पपुआ न्यू गिनी मंगळवारी ७.४ रिश्टर स्केलच्या भूकंपाने हादरले. भूकंपामुळे घाबरलेले नागरिक घर सोडून रस्त्यावर आल्याचे दिसले. भूकंपानंतर सुनामीचा इशारा देण्यात आला होता, मात्र हा धोका टळल्याने नागरिकांनी नि:श्वास टाकला आहे.

न्यू ब्रिटनच्या अाग्नेयेतील कोकोपो शहरापासून १३३ किमी अंतरावर ६३ किमी खोल भूकंपाचा केंद्रबिंदू होता. यानंतर ५.९ तीव्रतेचे भूकंपोत्तर धक्के बसले. प्रशांत प्रदेश सुनामी इशारा केंद्राने सुनामीचा इशारा दिला होता. मात्र, काही वेळानंतर हा धोका मावळला. भूगर्भातील अलीकडे होत असलेल्या बदलांमुळे भूकंप आला. यामध्ये कोणतेही मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही, असे भूकंपशास्त्रज्ञ मॅथ्यू मोईहोई यांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत, मात्र मंगळवारचा भूकंप शक्तिशाली होता, असे ते म्हणाले. भूकंपामुळे शाळा बंद करण्यात आल्या, मुलांना घरी सोडून देण्यात आले. अनेक इमारतींची तावदाने तुटली. वृक्ष उन्मळून पडले. मात्र, कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

नेपाळमध्ये पुन्हा भूकंप, भूकंपबळींची संख्या ७,५००
नेपाळला मंगळवारी पुन्हा भूकंपाचे धक्के बसले असून २५ एप्रिलच्या भूकंपातील बळींची संख्या ७,५०० हजारांवर पोहोचली आहे. सकाळी ६.३९ वाजता ४.०० तीव्रतेचा भूकंप झाला. धादिंग व नवाकोट जिल्ह्यांच्या सीमेवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता, अशी माहिती राष्ट्रीय भूकंप संशोधन केंद्राचे प्रमुख लोक बिजय अधिकारी यांनी दिली.

नेपाळच्या बागमती विभागातील या जिल्ह्यांत २५ एप्रिलच्या भूकंपाचा मोठा तडाखा बसला. यात राजधानी काठमांडू आणि सिंधुपाल चौक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान झाले. २५ एप्रिलनंतर ४ पेक्षा जास्त तीव्रतेचे १४३ भूकंपोत्तर धक्के बसले. सिंधुली आणि उदयपूर जिल्ह्यात नुकसानीचा आढावा घेण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...