आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Earthquake And Social Scientists Knew That Earthquake Will Struck Nepal

नेपाळच्या भूकंपाची होती पूर्वकल्पना, काठमांडूत जमले होते संशोधक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेपाळमध्ये प्रलयकारी भूकंप येणार असल्याची कल्पना काही भूगर्भ संशोधकांना होती. त्यामुळे सुमारे आठवडाभरापूर्वीच भूगर्भ आणि सामाजिक संशोधकांची 50 सदस्यांची एक टीम काठमांडूमध्ये दाखल झाली होती. भूकंप आला तर नेपाळमधील महत्त्वाच्या शहरांना कसे वाचवता येईल, या स्वरुपाचा अभ्यास ही टीम करीत होती.
1934 मध्ये नेपाळमध्ये प्रलयकारी भूकंप आला होता. यावेळी नेपाळची राजधानी काठमांडू अगदी नेस्तनाभूत झाली होती. हजारो नागरिक मृत्युमुखी पडले होते. आताही नेपाळमध्ये अशाच स्वरुपाचा भूकंप येणार याची पूर्वकल्पना मिळाली होती. पण हा भूकंप कधी आणि केव्हा येईल याची नेमकी माहिती मात्र उपलब्ध नव्हती. त्यामुळे संशोधकांची टीम काठमांडूसह महत्त्वपूर्ण शहरांची नासधूस कशी रोखता येईल याचा अभ्यास करण्यासाठी सुमारे आठवडाभरापूर्वी काठमांडूत आली होती.
काठमांडू प्रचंड गजबजलेले, जुन्या इमारतींचे, खुप बांधकाम झालेले आणि अनिर्बंध वाढ झालेले शहर आहे. त्यामुळे प्रथम या शहराचा अभ्यास करण्याला प्राथमिकता देण्यात आली होती.
यासंदर्भात सेसमोलॉजिस्ट आणि इंग्लंडच्या कॅम्रीज विद्यापिठाच्या अर्थ सायंस विभागाचे प्रमुख जेम्स जॅक्सन म्हणाले, की नेपाळमध्ये आलेला भूकंप एक असे नाईटमेअर आहे जे पडणारच होते. भौतिकशास्त्र आणि भुगर्भशास्त्राचा विचार केला तर जे घडणार होते ते प्रत्यक्षात घडले आहे. पण एवढ्या लवकर भूकंप येईल असे वाटले नव्हते.
जेम्स म्हणाले, की काही दिवसांपूर्वी मी भूकंपप्रवण क्षेत्रावर चालत होतो. तेव्हा मला असे वाटत होते, की येथे लवकरच भूकंप येणार आहे. पण आताच भूकंप येणार आहे असे सांगायला माझ्याकडे सबळ पुरावे उपलब्ध नव्हते.
शनिवारी नेपाळसह भारत आणि चीनमध्ये आलेल्या भूकंपात हजारो नागरिक मृत्युमुखी पडले असून लाखो बेघर झाले आहेत. जगभरातून त्यांना मदत केली जात आहे.