आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जपानमध्ये भूकंप: फुकुशिमामध्ये उसळल्या 10 फूट उंचीच्या लाटा, त्सुनामीचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो- जपानच्या ईशान्य भागाला मंगळवारी 6.9 तीव्रतेच्या भूकंपाचा जबरदस्त धक्का बसला. उत्तर पॅसिफिक समुद्रात 10 फूट उंचीच्या लाटा उसळल्या आहेत. परिणामी त्सुनामी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भूकंपामुळे 6 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

जपानच्या हवामान विभागाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मंगळवारी सकाळी 6 वाजता (भारतीय प्रमाण वेळेनुसार मध्यरात्री 2.30 वाजता) भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्र फुकुशीमात जमिनीखाली 10 किलोमीटर अंतरावर आहे.

दरम्यान, 2011 मध्ये जपानमध्ये आलेल्या शक्तिशाली भूकंंपामुळे फुकुशिया न्यूक्लिअर प्लांटचे मोठे नुकसान झाले होतेे. प्लांंटमध्ये भीषण स्फोट झाला होता.

टोकियोपर्यंत जाणवले भूकंपाचे धक्केे...
- यूएस जियोलॉजिकल सर्व्हेने (यूएसजीएस) या भूकंपाची तीव्रता सुरुवातीला 7.3 रिश्टर स्केल इतकी सांगितली होती. आता मात्र त्यात सुधारणा करत 6.9 इतकी जाहीर केली आहे.
- यादरम्यान फुकुशिमा सागरी किनार्‍यावर 1 ते 3 मीटर (जवळपास 10 फूट) उंचीच्या लाटा उसळल्या आहेत. तसेच त्सुनामी येण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, सकाळी 6 वाजून 38 मिनिटाला (स्थानिक) एक मीटर उंचीच्या लाटा फुकुशिमा न्यूक्लियर प्लांटला धडकल्या.
- भूकंपाच्या पार्श्वभूमीवर टोकियो इलेक्ट्रिक पॉवर कॉरर्पोलेशन फुकुशिमामध्ये आपल्या न्यूक्लियर प्‍लांटच्या नुकसानाचा आढावा घेत आहे.

पुढील स्लाइडवर वाचा...5 वर्षांपूर्वी फु‍‍कुशिमा न्यूक्लियर प्लांटमध्ये काय झाले होते?
बातम्या आणखी आहेत...