आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Earthquake In India, Pakistan And Afganistan On Last Night

जम्मू-काश्मीर-दिल्लीमध्ये रात्री उशीरा भूकंपाचे धक्के, अफगाणिस्तानात होते केंद्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्मक फोटो - Divya Marathi
प्रतिकात्मक फोटो
नवी दिल्ली - दिल्ली, जम्मू-कश्मीरसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये रविवारी रात्री उशीरा भूकंपाचे धक्के जाणवले. त्यात कोणत्याही प्रकारची हानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानात होते. त्यामुळे अफगानिस्तान आणि पाकिस्तानात अधिक धक्के जाणवले.

रात्री उशीरा जाणवले धक्के...
> रविवारी रात्री 11.49 वाजता भूकंपाचे धक्क जाणवले.
> त्याचे केंद्र अफगाणिस्तानच्या अश्कशाम भागापासून 22 किमी दूर होते.
> अश्कशाम अफगाणिस्तान-ताजिकिस्तानच्या सीमेवर आहे.
> भूकंप 92.4 किमी खोलवर जाणवला.
> यूएसजीएसच्या मते मुताबिक, रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 5.9 होती. पण पाकिस्तानच्या हवामान विभागाने हा भूकंप 6.2 तीव्रतेचा असल्याचे म्हटले.

भारतात अनेक ठिकाणी जाणवले धक्के
दिल्ली, जम्मू-काश्मीर, चंडिगड, पंजाब, हरियाणा, हिमाचल, उत्तराखंड, युपीचा काही भाग यासह उत्तर भारतात अनेक बागांत भूकंपाचे धक्के जाणवले. तसेच पाकिस्तानात पेशावर लाहोर, कराची, इस्लामाबाद याठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले.

महिनाभरापूर्वी आला होता मोठा भूकंप
यापूर्वी 27 ऑक्टोबरला अफगाणिस्तानातच 7.5 तीव्रतेचा भूकंप आला होता. त्यात 260 जण मारले गेले होते. त्यावेळी भारताच्या 11 राज्यांमध्ये धक्के जाणवले होते.

भूकंप येण्याचे कारण
पृथ्वीच्या पोटात 7 प्लेट्स आहेत त्या सारख्या फिरत असतात. ज्याठिकाणी या प्लेट्स एकमेकींना जास्त घासतात त्या झोनला फॉल्टलाईन म्हटले जाते. सारखे घर्षण झाल्याने प्लेट्सचे कोपरे मुडपले जातात. जेव्हा जास्त दबाव येतो त्यावेळी प्लेट्स तुटायला लागतात. जमिनीखालील उर्जा बाहेर येण्यासाठी मार्ग शोधू लागते. त्यानंतर भूकंप येतो.