आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेपाळच्या इतिहासात दुसरा शक्तीशाली भूकंप, पाहा सोशल मीडियात शेअर झालेले फोटो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: काठमांडूमध्ये भूकंपामुळे इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे.)

काठमांडू- नेपाळची राजधानी काठमांडू शनिवारी दुपारी 7.7 तीव्रतेचा भूकंपाने हादरली. या भूकंपाचा केंद्र काठमांडूपासून 80 किलोमीटरवर असलेल्या पोखरा येथे भूपृष्ठात 31 किलोमीटर अंतरावर आहे. स्थानिक वेळेनुसार 11 वाजून 42 मिनिटांनी भूकंपाचा पहिला तीव्र धक्का बसला. नंतर सव्वा बारा वाजेच्या सुमारास दुसरा धक्का जाणवला. दुसर्‍यांदा आलेल्या भूकंपाची तीव्रता 6 होती. नेपाळच्या इतिहासात हा दुसरा शक्तीशाली भूकंप असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी 1934 मध्ये नेपाळच्या उत्तर बिहारमध्ये 8.0 तीव्रतेचा भूकंप आला होता. यात सुमारे 10,600 लोकांचा मृत्यू झाला होते.

काठमांडूमधील शेकडो इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. इमारतींच्या भिंतींनाही तडे गेले. फोन सेवा ठप्प झाली आहे. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची अद्याप माहिती मिळाली नाही. नेपाळमध्ये आलेल्या भूकंपाचे धक्के भारतासह पाक आणि बांगलादेशात जाणवले. खबरदारी म्हणून दिल्ली आणि कोलकाता मेट्रोची वाहतूक बंद करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
ढाका 'ट्रिब्यून'नुसार, पहिला धक्का तीन ते पाच म‍िनिटे जाणवला. बांगलादेशाची राजधानी ढाकासह आसपासच्या भागात दुपारी सव्वा बाराला भूकंपाचे धक्के जाणवले. कोणत्याही नुकसानाचे वृत्त नाही.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, सोशल मीडियात शेअर झालेले भूकंपाचे फोटो...