आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Earthquake In Nepal Many Parts Of Country News In Marathi

:नेपाळमध्ये भूकंपानंतर आता मुसळधार पाऊस, 1050 भारतीय पोहोचले स्वदेशात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
7:45 PM: एयरफोर्सने आतापर्यंत 1050 भारतीयांना नेपाळबाहेर काढले, विदेश मंत्रालयाने दिली माहिती
.......................................
7:40 PM: मुसळधार पाऊस आणि विजा कडाडल्याने काठमांडू विमानतळ बंद
.......................................
7:30 PM: वातावरण बिघडल्यामुळे भारताचे दोन विमान काठमांडूत उतरू शकले नाही. मदत सामग्री घेऊन जात होते विमान, इलाहाबादमध्ये लँड झाले विमान
........................................
6:58 PM: बीएसएनएल आणि एअरटेलनंतर वोडापोननेही नेपाळसाठीच्या कॉल्सचे कमी केले दर
........................................
6:40 PM: एव्हरेस्ट भागात हिमस्खलन झाल्याने 22 जणांचा मृत्यू, 217 बेपत्ता. एक्सपेडिशनसाठी घेण्यात आली भारतीय टीम सुरक्षित
.......................................
6.30 PM: नुकत्याच आलेल्या आकड्यांनुसार, नेपाळमध्ये मरणाऱ्यांची अधिकृत 2200 एवढी आहे. तर भारतात 67 जाणांचा मृत्यू झाला आहे, यामध्ये 51 मृत्यू बिहारमध्ये झाले आहेत.
.......................................
6.28 PM: जयशंकर यांनी सांगितले की, रक्सौल आणि सोनौलीवरून रस्त्याच्या साह्याने नेपाळमध्ये फसलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू वेगाने सुरू झाले आहेत. यासाठी 35 बसेस पाठवण्यात आल्या आहेत.
.......................................
6.25 PM: जयशंकर म्हणाले की,नेपाळमध्ये फसलेल्या भारतीयांची संख्या हजारांमध्ये आहे. अजूनपर्यंत सरकारजवळ निश्चित आकडे नाहीत.
.......................................
6.22 PM: जयशंकर यांनी सांगितले की, रविवारी एनडीआरएफच्या तीन तुकड्या नेपाळला पाठवण्यात आल्या आहेत. यामध्ये टेंट, जेवण आणि पाणी पाठवणअयात आले आहे.
.......................................
6.20 PM: विदेश सचिव एस जयशंकर म्हणाले की, एयरफोर्सचे 13 विमान काठमांडूला पाठवण्यात आले आहेत. यामधील पाच काठमांडूत पोहोचले आहेत.
............................................

6.10 PM: गृह सचिव, संरक्षण सचिव, विदेश सचिव घेत आहेत पत्रकार परिषद, भूकंपाबद्दल देणार माहिती
.......................................
5:45 PM: पुढील 24 तासांमध्ये नेपाळ आणि भारतातील अनेक भागात होऊ शकतो मुसळधार पाऊस, मदत कार्यात होऊ शकतो अडथळा
.......................................
5:37 PM: बॉडी बॅग्स, टेंट्स आणि पाण्यासाठी नेपाळ सरकारचे आवाहन
---------------------------
4:50 PM: पंतप्रधानांच्या घरी सुरू असलेली समिक्षा बैठक समाप्त. संरक्षण मंत्री, गृह मंत्री, विदेशी मंत्री यांचाही होता बैठकीत समावेश
.......................................
4:45 PM: 225 भारतीय प्रवाशांना घेऊन काठमांडूवरून दिल्लीला पोहोचला C17 ग्लोबमास्टर विमान .
......................................
4:30 PM: नेपाळचे माजी पंतप्रधान बाबूराम भट्टाराई म्हणाले की, सध्या शहरातून आणि ज्या ठिकाणी जाता येते तेथून माहिती मिळत आहे. संपूर्ण माहिती मिळाल्यावर मृतांचा आकडा 5 ते 10 हजारांवर पोहोचू शकतो.
.......................................
4:15 PM: पंतप्रधानांच्या निवासस्थानी हाइलेवल बैठक सुरू झाली. भूकंपानंतर बचाव कार्यासाठी बनत आहे रणनिती
.......................................
3:55 PM: मित्राच्या लग्नासाठी नेपाळला गेलेला बॉलिवूड डायरेक्टर कुणाल देशमुख सुरक्षित, सुरुवातीला हरवले आहेत असे सांगण्यात आले होते.
.......................................
3.20 PM: राजनाथ सिंह म्हणाले, नेपाळला संपूर्ण मदत करू, बिहारवरून पाठवण्यात आली मदत
.......................................
3.10 PM: काठमांडूत भूकंपाचा फटका बसलेल्या लोकांशी बाबा रामदेव यांनी संवाद साधला
.......................................
2.26 PM: विदेश मंत्रालयाने ट्वीट करून सांगितले की, एक सी 17 विमान 52 प्रवाशांना घेऊन आणि आयएल 76 विमान 200 प्रवाशांना घेऊन दिल्लीसाठी रवाना झाले आहे.
-----------------
2.40 PM: काठमांडूत विमान उतरू शकले नाही. विमानतळावरील स्ट्रीपमध्ये बिघाड, एथोरिटीने लँडींगला परवानगी दिली नाही.
........................................
2.30 PM: पटनामध्ये DM ने 2 दोन दिवसांसाठी शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले.
........................................
2.15 PM: शिवसेनेचे खासदार पंतप्रधान मदत निधीमध्ये देणार एका महिन्याचा पगार
........................................
2.10 PM: राजस्थानच्या नदबई येथे घराची छत पडल्याने एका 11 वर्षीय मुलीचा मृत्यू
........................................
2.00 PM: पंतप्रधान मोदींनी 3.30 वाजता एक उच्चस्तरीय बैठक बोलावली. भूकंपानंतरच्या परिस्थितीचा घेणार आढावा
........................................
1.50 PM: एका तासानंतर दिल्ली मेट्रोसेवा पूर्ववत सुरू करण्यात आली.
........................................
1.45 PM: काठमांडू विमानतळावर एअर ट्रैफिक चार वाजेपर्यंत सस्पेंड करण्यात आले, मात्र बचाव कार्य सुरू राहणार
........................................
1.41 PM: संपूर्म यंत्रणा तपासल्यानंतर दिल्ली मेट्रो पुन्हा सुरू, वेग कमी ठेवणार
........................................
1.31 PM: भारतावरून नेपाळसाठी उडणारे विमान चार वाजेपर्यंत थांबवण्यात आले. कोलकाता मेट्रोसुध्दा थांबवली.
........................................
1.25 PM: बिहारच्या मधेपुरा जेलमधील भिंत कोसळली. भूगर्भ शास्त्री एनसी पंत म्हणाले की, यापुढील भूकंपाचे धक्के अजून तिव्र असतील
........................................
1.00 PM: नेपाळच्या कोडारीमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे दोन झटके जाणवले. रिक्टर स्केलवर 5.0 आणि 4.7 होती तिव्रता
........................................
12: 50 PM: भूकंपाच्या हादऱ्यानंतर दिल्ली मेट्रो सेवा थांबवण्यात आली. लोक घराबाहेर पडले
........................................
12:41 PM: भूकंपाची तिव्रता रिक्टर स्केलवर 6.7 एवढी मोजण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू काठमांडूपासून 80 किमी दूर असलेल्या कोडारीत.
........................................
12.39 PM: नेपाल आणि भारतात रविवारी पुन्हा एकदा भूकंपाचे झटके जाणवले. दिल्ली-एनसीआरसोबतच पंजाब, उत्तराखंड, झारखंड, एमपी आणि असामपर्यंत हे भूकंपाचे हादरे बसले
काठमांडू/ नवी दिल्ली/ पाटणा - नेपाळसह भारतात आज (रविवार) पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसले. दिल्ली-एनसीआरसह पंजाब, बिहार, झारखंड, मध्यप्रदेश, आसाममध्ये धक्के जाणवले रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.9 एवढी नोंदवण्यात आली. 12 वाजून 39 मिनिटांदरम्यान जाणवलेल्या भूकंपाच्या धक्के जाणवले. यामुळे दिल्ली मेट्रो सेवा काही काळासाठी थांबवण्यात आली होती. या भूकंपाचा केंद्र काठमांडूपासून 80 किलोमीटर अंतरावर कोडारी येथे असल्याची माहिती मिळाली आहे.

रविवारी आलेल्या भूकंपामुळे बिहारमधील मधेपुरा तुरुंगाची भिंत कोसळली. त्यामुळे तुरुंगातील कैदी पळून गेल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच राजस्थानात एका चिमुरडीचा मृत्यू झाल्याची माहिती ‍मिळाली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भूकंपग्रस्तांचे पुसणार अश्रू
पंतप्रधान नरेंद्र यांनी रविवारी आकाशवाणीवरील कार्यक्रम 'मन की बात'मध्ये उद्‍धवस्त झालेल्या नेपाळविषयी दु:ख व्यक्त केले. नेपाळला आपण सर्वप्रकारची मदत करू, असे आश्वासन यावेळी दिले.

मोदी म्हणाले की, 'आज 'मन की बात'मध्ये संबोधित करण्‍याची माझी इच्छा होत नाही आहे. नेपाळमध्ये जे नुकसान झाले ते पाहून फार दुःखी झालो आहे. आम्ही नेपाळचे अश्रू पुसणार आहोत. देशातही अनेक ठिकाणी अशा प्रकारचा भूकंप झाला आहे, अनेकांचे प्राण गेले आहेत. त्या सर्वांनाच सरकार मदत करेल." देशभरातील मृतांच्या नातेवाईकांना मोदी सरकारकडून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

दरम्यान, नेपाळमध्ये 81 वर्षांनंतर आलेल्या शनिवारी आलेल्या शक्तीशाली भूकंपाने सर्वत्र हाहाकार उडाला आहे. मृतांचा आकडा सातत्याने वाढतच आहे. या भूकंपाने आतापर्यंत 2500च्या वर लोकांचा बळी घेतला आहे. नेपाळच्या गृहमंत्रालयाने 1950 लोकांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले आहे. ढिगार्‍याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. काठमांडूमध्ये 721 लोकांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक मीडियाने म्हटले आहे. दोन दिवसांत नेपाळमध्ये भूकंपाचे लहान-मोठे 30 धक्के बसले आहेत. दुसरीकडे, काठमांडू विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण कक्षात (एटीसी) बिघाड झाल्यामुळे विमान सेवा विस्कळीत झाली आहे. परिणामी भारतीय वायुसेनेच्या मदत कार्य रविवारी संध्याकाळपर्यंत थांबवण्यात आले आहे.
रविवारीही बसले भूकंपाचे सहा धक्के
आज (रविवारी‍) सकाळी पावणे सहा वाजेपासून सकाळी अकरा वाजेदरम्यान भूकंपाचे सहा धक्के बसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. लिमजुंगमध्ये सकाळी आलेल्या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर 5.6 एवढी नोंदवण्यात आली. नेपाळसाठी पुढील 48 तास धोक्याचे असल्याचे हवमान खात्याने म्हटले आहे

पशुपतीनाथ मंदिराचेही नुकसान...
नेपाळमधील विश्वप्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिराचे नुकसान झाले आहे. मंदिराच्या बाहेरील भिंतीना तडे गेले आहेत. मंदिराशेजारी असलेली इमारत कोसळली असून मोठा ढिगारा जमा झाला आहे. परमेश्वराचे नामस्मरण करण्‍याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे मंदिराचे पुरोहीतांनी म्हटले आहे. पुढील 72 तासांत पुन्हा भूकंपाचे धक्के बसणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

नॅशनल डिजास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीने नेपाळमध्ये बेपत्ता नागरीकांच्या माहितीसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. नवी दिल्ली- 011-26701728, 011-26701729, 09868891801, काठमांडू येथील भारतीय दुतावास हेल्पलाइन क्रमांक -+9779851107021, +9779851135141

नेपाळमध्ये भारताचे ऑपरेशन 'मैत्री'
भारत सरकारने नेपाळला मदतीचा हात दिला आहे. नेमाळमध्ये भारताने ऑपरेशन 'मैत्री' सुरु केले आहे. एनडीआरएफचे पथके मदतकार्यात दिवसरात्र परिश्रम घेत आहेत. एनडीआरएफचे डायरेक्टर जनरल ओ.पी.सिंह हे स्वत: नेपाळमध्ये असून ते परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. भारतीय वायुदल अप्रतिम कामगिरी करत आहे. वायुदलाचे 10 पेक्षा जास्त Mi - 17 हेलीकॉप्टर नेपाळमध्ये दाखल झाले आहेत. तसेच 3C - 17 मालवाहू विमाने आणि 3 IL- 76 मालवाहू विमाने नेपाळमध्ये तैनात करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये आठ भारतीय पर्यटकांचा समावेश आहे. पुढील 48 तासांपर्यंत भूकंपाचे धक्के बसण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

नेपाळमध्ये पर्यटन, देवधर्मासाठी गेलेले महाराष्ट्रातील 556 पेक्षा जास्त पर्यटक सुखरूप असल्याची माहिती विविध सूत्रांद्वारे मिळाली आहे. तीन विमानांच्या मदतीने या पर्यटकांना सुखरुप मायदेशात आणणे नागपूरच्या पाच पथकांत 240 लोकांचा समावेश आहे. नाशकातून 100 जण तीर्थयात्रा, तर 15-20 जण ट्रेकिंगसाठी गेले आहेत. नांदेडचे ४२ जण नेपाळमधील पोखरा गावात सुखरूप आहेत.

दरम्यान, नेपाळचा भूकंपाचा भारताला देखील तडाखा बसला आहे. भारतात मृतांचा आकडा 51 वर पोहोचला आहे. सर्वाधिक नुकसान बिहार आणि उत्तरप्रदेशात झाले आहे. बिहारमध्ये 38 जणांचा मृत्यू, अनेक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. पूर्व चंपारण्यमध्ये 7, दरभंगा-5, सीतामढी-5, सारण-4 जणांचे मृत्यू झाले. अररिया-3, मधुबनी-शिवहर प्रत्येकी दोन जणांचे प्राण गेले.

राज्यात आगामी 48 तासांत भूकंपाचे आणखी धक्के बसण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेश : नेपाळजवळील गोरखपूरमध्ये, सर्वाधिक परिणाम, 9 जणांचा मृत्यू
भूकंपामुळे उत्तर प्रदेशात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक नुकसान नेपाळच्या शेजारी असलेल्या गोरखपूर जिल्ह्यात झाले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी 7 लाख रुपयांची, तर जखमींना 10 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

देशभरात बसले धक्के
बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, दिल्ली-एनसीआर, राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, तामिळनाडू, आंध्र, केरळ, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोरम, पश्चिम बंगाल, ओडिशा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडलाही भूकंपाचे धक्के. 1991 नंतर आजपर्यंतचा पहिल्यांदाच एवढा प्रभावित परिसर. म्हणजे देशात १९ लाख चौरस किमी परिसरात भूकंप 80 कोटी लोक हादरले.

असा होता भूकंप
- रिश्टर स्केलवर 7.7 ची तीव्रता
- काठमांडपासून 80 किमीवर लामजुंगमध्ये जमिनीखाली 15 किमीवर होता केंद्रबिंदू
- दिवसभरात बसले 17 हून अधिक धक्के
- 10 ते 15 दिवस आणखी भूकंपाचे धक्के बसणार

मदतकार्यात भारत
- पंतप्रधानांची आपत्कालीन बैठक, वेगळा नियंत्रण कक्ष
- एनडीआरएफच्या १० टीम नेपाळला रवाना, रविवारी आणखी मदत पाठवण्यात येणार
- दोन ग्लोबमास्टरसह चार विमाने रवाना, मदतकार्यासाठी १० हेलिकाॅप्टरही पाठवले.

मी मंदिराला खंडहर होताना पाहिले
काठमांडूच्या टीव्ही वाहिनीत व्हिडिआे एडिटर असलेल्या शिवा दलाल यांनी एका संकेतस्थळावर घटनेचा जिवंत वृत्तांत मांडला. तो असा : मी काठमांडूत कार्यालयाजवळ सुरक्षित आहे. प्रत्येकाच्या मनात भीती आहे. मला येथे हेलिकॉप्टर आणि अॅम्ब्युलन्सचे आवाज ऐकायला मिळत आहेत. मी डोळ्यात एका मंदिराला खंडहर झाल्याचे पाहिले. काही वेळापूर्वी मी त्रिपुरेश्वर येथील माझ्या कार्यालयात होतो. त्या वेळी भूकंपाचा पुन्हा धक्का जाणवला. असा अनुभव मी कधीही घेतला नव्हता.

जमीन गिळंकृत करेल वाटले ..
४४ वर्षीय ब्रिटिश सीन जेम्स दुबईत राहतात. घटनेच्या वेळी ते एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या

उत्तरेकडील भागात होते. टेलिग्राफला दिलेली माहिती अशी :
मी एक व्यावसायिक गिर्यारोहक आहे. मी याअगोदरही अनेक वेळा हिमस्खलनाचा अनुभव घेतला आहे. परंतु कधीच एवढा घाबरलो नव्हतो. भूकंपाचा धक्का बसल्यानंतर एखाद्या बोटीवर असल्यासारखे वाटले होते. धरणीकंप जाणवत होता. वाटत होते. खोल जाऊन पडेल. जमीन दुभंगेल. हा भयंकर अनुभव होता.

भूकंपात रामदेव बाबा बचावले
योग शिबिरासाठी गेलेले रामदेव बाबा भूकंपात बालंबाल बचावले. त्यांचा अनुभव त्यांच्याच शब्दात : मी निघाल्याच्या पाच मिनिटांनंतरच आपला पेंडॉल खाली कोसळला. कारमध्ये बसणार होतो, एवढ्यात कार जोरजोराने हलत होती. मी पहिल्यांदा इमारत कोसळताना पाहिली, असा थरारक अनुभव येण्याची ही पहिलीच वेळ होती.

ऐतिहासिक स्वयंभूनाथ स्तूप सुरक्षित
भूकंपाच्या धक्क्यानंतरही काठमांडूतील ऐतिहासिक स्वयंभूनाथ स्तूप सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. परिसरात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. छोटी दुकाने, मंदिरे १५ सेकंदांत जमीनदोस्त झाली. भूकंपाचे धक्के बसल्यानंतर एकच गोंधळ उडाला. पर्यटकांनी धावपळ करण्यास सुरुवात केली. काही ढिगाऱ्याखाली दबले. काहींना बाहेर काढण्यात आले तेव्हा ते रक्तबंबाळ झाले होते. काहींचे पाय तुटले तर काहींचे डोके फुटलेले.

रुग्णालयात गर्दीच गर्दी, रस्त्यावरच उपचार
नेपाळमधील नैसर्गिक संकटाचे चित्र अतिशय विदारक अाहे. जखमींना रस्त्यावरच उपचार घ्यावे लागत आहेत. रुग्णालयांत गर्दीच गर्दी दिसली.

पुढील स्लाइड्सवर वाचा, एव्हरेस्टही हादरला, कसा झाला भूकंप आणि गेल्या तीस वर्षांतील विध्वंसकारी भूकंपानंतरची नेपाळमधील फोटो...