आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान-अफगानिस्तानमध्‍ये भूंकप, जम्मू-कश्मीरमध्‍येही धक्‍के जाणवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबुल - पाकिस्‍तान आणि अफगानिस्तानमध्‍ये आज (शुक्रवार) दुपारी 2.39 वाजता 5 रिक्‍टर तीव्रतेचे भूकंपाचे झटके बसले. शिवाय भारतातील जम्‍मू काश्मीरमध्‍येही काही ठिकाणी हे धक्‍के जाणवले असून, 4 जानेवारीला भारताचे मणिपूर भूकंपाने हादरले होते.

कुठे कुठे झाला भूकंप...
- यूएसजीएसनुसार, या भूकंपाचे केंद्र अफगानिस्तानातील जर्म आहे.
- खैबरपख्तूनवा, इस्लामाबादशिवाय पेशावर, मलकांद, मनसेहरा, हरिपूर आणि एबटाबादमध्‍ये तो जाणवला.
- गत वर्षी 25 डिसेंबरला याच भागात भूकंप झाला होता.
4 जानेवारीला बसले होते मणिपूरला 6.7 तीव्रतेचे झटके
- सोमवारी सकाळी 4 वाजून 37 मिनिटांनी पहिला झटका बसला होता. त्‍याची तीव्रता 6.7 एवढी होती. दुसरा झटका 9.27 वाजता जाणवला.
- यामुळे मणिपूरमध्‍ये आठ लोकांचा मृत्‍यू झाला तर 100 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते.
- मणिपूरशिवाय आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, नगालँड, मिजोरम, त्रिपुरा, वेस्ट बंगाल, झारखंड, बिहार आणि सिक्कममध्‍येही हे धक्‍के जाणवले होते.
का येतो भूकंप?
पृथ्वीच्या पोटात सात प्लेट्स असतात ज्या सतत फिरत असतात. ज्या ठिकाणी या प्लेट्स एकमेकांना धडकतात त्या भागाला फॉल्ट लाइन संबोधले जाते. परत-परत प्लेट्स एकमेकांना धडकण्यामुळे त्याचे कोणे मोडले जातात. जास्त दबाव वाढला तर त्या तूटतात आणि आतील ऊर्जा बाहेर येण्याचा मार्ग शोधत असते. त्या हलचालीनंतर भूकंप होतो.
भूकंपामुळे किती नुकसान होते
रिक्टर स्केल
परिणाम
0 ते 1.9
फक्त सीज्मोग्राफनेच कळते.
2 ते 2.9
हल्के कंपन.
3 ते 3.9
एखादा ट्रक तुमच्या शेजारून जावा, एवढा परिणाम.
4 ते 4.9
खिडकीच्या काचा फुटू शकतात, भिंतीवर टांगलेल्या फोटोफ्रेम पडू शकतात.
5 ते 5.9
फर्नीचर जागेवरुन हलू शकते.
6 ते 6.9
इमारतींचा पाया हलू शकतो. वरच्या मजल्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता.
7 ते 7.9
इमारती कोसळतात. जमीनीच्या आतील पाइप फुटू शकतात.
8 ते 8.9
इमारतींसह मोठ-मोठे पुल पडू शकतात. सुनामीचा धोका निर्माण होऊ शकतो.
9 आणि त्यापेक्षा जास्त
सर्वत्र नासधूस. कोणी मैदानात उभे असेल तर त्याला जमीन हलताना दिसेल. समुद्र जवळ असेल तर सुनामी.
भूकंपाचे धक्के रिश्टर स्केलवर आधीच्या स्केलपेक्षा 10 पटीने जास्त शक्तीशाली असतात.