आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: जपानमध्ये भूकंप; ३२ ठार, १००० जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो - दक्षिण जपानमध्ये दोन दिवसांत दुसऱ्यांदा भूकंपाचे मोठे धक्के बसले. शनिवारी आलेल्या भूकंपाची तीव्रता ७.३ हाेती. भूकंपातील बळींची संख्या ३२ वर पोहोचली आहे. शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची माहिती मिळाली आहे.

गुरुवारीही येथे ६.२ तीव्रतेचा भूकंप आला होता. यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला. साधारण १००० जणांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात अाले आहे. यामध्ये १८४ जणांची प्रकृती गंभीर आहे. शनिवारी आलेल्या भूकंपाचा केंद्र कुमामोतोजवळ कियुसी बेटावर जमिनीत १० किमी खोल होता. कुमामोतोच्या गावांचा संपर्क तुटला आहे. येथील एकाच भागातील जवळपास हजार लोक गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मिनामी आसोमध्ये तोकाई विद्यापीठातील वसतिगृहाची इमारत पडली आहे.

यामध्ये जवळपास डझनभर नागरिक गाडल्याची शक्यता आहे. भूकंपातून निर्माण झालेला हजारो टन मातीचा थर घर, रस्ते आणि रेल्वे रुळावर साचला आहे. बचाव पथकाचे कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. ७० हजार जणांना सुरक्षितरीत्या बाहेर काढले आहे. जपान भूकंपप्रवण प्रदेशात येत असल्यामुळे येथे भूकंपाच्या घटना सामान्य आहेत.


पुढील स्लाइडवर वाचा, तब्बल 6 तास ढिगार्‍याखाली होती चिमुरडी...