आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इटलीत भूकंप; 73 नागरिक मृत्युमुखी, डोंगराळ भागातील गावांना धक्का

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकुमोली- इटलीला बुधवारी भल्या पहाटे विनाशकारी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. त्यात किमान ७३ जणांचा मृत्यू झाला. अनेक लोक जखमी झाले आहेत. भूकंपाची तीव्रता सुमारे ६.२ रिश्टर एवढी होती.

उत्तरेकडील डोंगराळ प्रदेशात हा धक्का जाणवला. अनेक गावांत पडझडीच्या घटना घडल्या आहेत. अमाट्रिस, अकुमोली, अर्काटा, डेल ट्रोंटो यासह अनेक गावे भूकंपाने हादरली आहेत. पेस्कारा डेल ट्रोंटो या गावाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. निम्मे गाव जमिनीत गडप झाल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. त्यात असंख्य ग्रामस्थ बेपत्ता झाले. काही मोठ्या ढिगाऱ्यांखाली अडकले आहेत. माझी बहिण व तिचे पती दगडविटांच्या ढिगाऱ्याखाली दबले आहेत. परंतु ढिगाऱ्यातून कसलाही आवाज येत नाही. मला कसेबसे माझ्या भाच्यांना बाहेर काढण्यात यश मिळाले. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत, असे इमाकॉलासा पोस्टीग्लिआेन यांनी हताशपणे सांगितले. एका ढिगाऱ्याखाली नऊ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला. भूकंपाचे धक्के अत्यंत तीव्र स्वरूपाचे होते. त्यामुळेच दिडशे किलो मीटर अंतरावरील रोमही हादरले.
सर्व भारतीय सुरक्षित : सुषमा स्वराज
इटलीत मोठ्या संख्येने भारतीय नागरिक राहतात. परंतु सर्व भारतीय सुरक्षित असल्याचे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले आहे. भूकंप मोठ्या तीव्रतेचा असला तरी त्याचा फटका सुदैवाने भारतीयांना बसलेला नाही, अशी माहिती स्वराज यांनी ट्विट करून दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीतील भूकंपाच्या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. मृतांच्या नातेवाइकांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असे मोदी म्हणाले.
म्यानमारमध्ये प्राचीन मंदिरांची पडझड
इटलीसह म्यानमारमध्येही भूकंपाचा धक्का बसला. त्यात बागान शहरातील काही जगप्रसिद्ध पॅगोडांची पडझड झाली आहे. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ६.८ एवढी नोंदवण्यात आली आहे. बागान शहराला दररोज सुमारे अडीच हजार पर्यटक भेट देतात. हे पॅगोडा १० ते १४ व्या शतकामधील आहेत. २०११ नंतर देशात पर्यटनाला अधिक गती मिळाली होती. दरम्यान म्यानमारमधील भूकंपाने शेजारचे थायलंड, बांगलादेशही हादरले. म्यानमारमध्ये हादऱ्यानंतर लोक भीतीने रस्त्यावर आले.
भारतात कुठे झाला भूकंप
> बंगाल, बिहार, आसम, झारखंडपर्यंत या भूकंपाचे झटके जाणवले.
> कोलकाता, पाटणा, रांची, गुवाहाटीमध्‍ये जवळपास 10 सेकंद भूकंप झाला.
कोलकातामध्‍ये थांबवली मेट्रो...
> भूकंपाचे झटके जाणवल्‍यानंतर कोलकाताची मेट्रो सेवा थांबवण्‍यात आली.
> पश्चिम बंगालमध्‍ये कोलकातासह मालदा, खडगपूर, जलपाईगुडी, सिलीगुडीमध्‍ये भूकंप जाणवला.
दोन दिवसापूर्वी दिल्लीतही भूकंप
> सोमवार दुपारी दिल्‍लीमध्‍येही भूकंपाचे झटके जाणवले.
> दिल्ली शिवाय हरियाणामध्‍येही भूकंप झाला.
> त्‍याची तीव्रता केवळ 3.5 रिक्टर होती.
> हरियाणातील महेंद्रगड केंद्र होते.
याही देशांत भूकंप
> म्‍यानमार, इटली, आणि भारतासह बांगलादेश, थायलँड, व्‍हि‍यतनाम आणि चीनच्‍या काही भागांत भूकंप झाला.
म्‍यानमारमध्‍ये दोन दिवसांत दुसऱ्यांदा भूक‍ंप
> म्‍यानमारमध्‍ये दोन दिवसांत दुसऱ्यांदा भूकंप झाला.
> मंगळवारी 5.3 तीव्रतेचे झटके नोंदवले गेले होते.
पुढील स्लाइडवर पाहा, भूकंपानेतरचे इटलीतील फोटोज..
बातम्या आणखी आहेत...