आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

2018 चे वर्ष विनाशकारी! जगभर येणार मोठे भूकंप, पृथ्वीची गती मंदावली; शास्ज्ञज्ञांचा इशारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - पुढच्या वर्षी अर्थातच 2018 मध्ये जगभरात मोठ-मोठ्या भूकंपांचा इशारा देण्यात आला आहे. हा इशारा तज्ञ संशोधकांनी दिला आहे. यासाठी त्यांनी पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीचे कारण दिले आहे. पृथ्वीच्या फिरण्याची गती मंदावल्याने विविध देशांमध्ये महाप्रलय होऊ शकते असा संशोधकांचा दावा आहे. विशेष म्हणजे, ही गती दिवसेंदिंवस कमी होत आहे. पृथ्वीच्या फिरण्याची गती आणि भूकंप यांचा एकमेकांशी थेट संबंध आहे. 

 

दोन विद्यापीठांचे संयुक्त संशोधन
- यूनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडोचे रॉजर बिल्हम आणि यूनिव्हर्सिटी ऑफ मॉन्टानाच्या रिबेका बेंडिक यांनी भूकंपावर संशोधन केले आहे. त्यांनी आपला संशोधन अहवाल जियोलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिकेला दिला आहे. 
- या संशोधकांनी पृथ्वीच्या परिवलनाची गती कमी झाल्याचा दावा केला आहे. या गतीमध्ये काही मिलिसेकंदांचा फरक पडला आहे. हेच फॅक्टर पृथ्वीच्या आतील एनर्जीला बाहेर काढतात. ज्यामुळे मोठ-मोठे भूकंप होतात. तशीच अवस्था 2018 मध्ये होईल अशी भिती आहे. 

बातम्या आणखी आहेत...