आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लठ्ठ पात्राचे कार्टून मुलांना बनवताहेत तुंदिलतनू, टीव्ही पाहत जेवणाता दुष्परिणाम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लठ्ठ व्यक्तिरेखेचे कार्टून जंक फूड खाण्याच्या मुलांच्या सवयीला प्रोत्साहन देत आहेम. जी मुले अशा व्यक्तिरेखा असणाऱ्या कार्टूनचा टीव्ही शो पाहतात, त्यांचा आहार सामान्यांच्या तुलनेत जवळपास दुप्पट होतो. एका नव्या संशोधनात ही बाब समोर आली. द जर्नल ऑफ कन्झ्युमर सायकोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात म्हटले की, मुलांची पुस्तके, चित्रपट, टीव्ही, व्हिडिओ गेम्स, फास्टफूड मेनू आणि ग्राफिक कथानकांमधील कार्टून व्यक्तिरेखा मुलांच्या वर्तणुकीवर अप्रत्यक्षरूपात परिणाम करत आहेत. विशेषकरून त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर तो जाणवतो.

संशोधकांनी आठवी इयत्तेच्या ६० मुलांमध्ये काहींना जेलिबीनप्रमाणे कृश शरीर असलेल्या पात्राच्या कार्टूनचे चित्र दाखवले. यानंतर कँडी ठेवलेल्या भांड्याकडे पाहून ते घेऊन जाण्याचा इशारा करण्यात आला. ज्या मुलांना लठ्ठ व्यक्तिरेखेचे कार्टून दाखवले होती, त्यांनी काटकुळ्या पात्राचे कार्टून पाहणाऱ्या मुलांच्या तुलनेत दुप्पट कँडी घेतल्या. लठ्ठ कार्टून पात्र पाहणाऱ्या मुलांनी साधारण ३.८ कँडी खाल्ल्या, त्या तुलनेत अन्य मुलांनी साधारण १.७ कँडी घेतल्या. या व्यतिरिक्त काही मुलांना कॉफी मगची प्रतिमा दाखवण्यात आली. या मुलांनी साधारण १.५ कँडी खाल्ली.

मात्र, त्याचबरोबर आरोग्याप्रति जागृती दर्शवणारे कार्टून मुलांना दाखवल्यास यातील दुष्परिणाम रोखता येऊ शकतील, असे संशोधकांना आढळले आहे. अन्य एका प्रयोगात प्राथमिक शाळेच्या १६७ मुलांना दोन कार्टून पात्रे दाखवण्यात आली. यामध्ये एक लठ्ठ होता, तर दुसरा काटकुळा होता. पहिल्यांदा त्यांना आरोग्याला हानी पोहोचवणाऱ्या गोष्टींचा विचार करण्यास सांगितले. उदा. टीव्ही पाहणे किंवा सोडा पिणे. काही मुलांना कुकीज देण्याआधी आणि काहींना कुकीज घेतल्यानंतर प्रश्न विचारण्यात आले. ज्या मुलांना लठ्ठ पात्राचे कार्टून दाखवूनही पहिल्यांदा प्रश्न विचारण्यात आले, त्यांनी कमी कुकीज खाल्ल्या. ज्या मुलांना कुकीज खाल्ल्यानंतर प्रश्न विचारण्यात आले, त्यांनी सरासरी ४.२ कुकीज खाल्ल्या. कोलाेरॅडो युनिव्हर्सिटीच्या लीड्स बिझनेस स्कूलचे प्रो. मार्गरेट सी. कॅम्बेल यांचा हा अहवाल द जर्नल ऑफ कन्झ्युमर सायकोलॉजीमध्ये प्रकाशित झाला आहे. आपण सर्व भोवतालच्या वातावरणानुसार प्रतिक्रिया देतो. त्यात जास्त भोजन करण्यासही प्रोत्साहन दिले जाऊ शकते, असे त्या म्हणाल्या. मात्र, तरीही आई-वडिलांकडून खाण्यापिण्याच्या सवयीबाबत मुलांना सतत जागरूक केले जाऊ शकते. मुले जेव्हा जेवत असतील तेव्हा त्यांनी टीव्ही पाहू नये. करमणूक व भोजन वेगवेगळे असले पाहिजे. मुलांच्या आवडीनिवडीवर परिणाम करू शकणाऱ्या अनेक गोष्टी टीव्हीवर असतात.
- The New York Times