आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ebola Pictures Win 2015 Sony World Photography Awards

इबोलाच्या छायाचित्र मालिकेने जिंकला सोनी वर्ल्ड फोटोग्राफी पुरस्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटोग्राफर- जॉन मोर, पुरस्कार - फोटोग्राफर ऑफ द ईयर. फोटो - लायबेरियात इबो‍ला पीडित व्यक्तिचा मृत्यू झाला.
सोनी वर्ल्ड फोटोग्राफी पुरस्कार विजेत्यांचे नावे जाहीर झाली आहेत. अमेरिकन छायाचित्रकार जॉन मोरने इबोलावरील छायाचित्र मालिकेसाठी सोनी वर्ल्ड फोटोग्राफी पुरस्कार जिंकला आहे.इबोलाचे प्रभाव असलेल्या लायबेरियात काढलेल्या छायाचित्रांकरिता त्यांना प्रोफेशनल फोटोग्राफर ऑफ द इयर पुरस्कार देण्‍यात आला आहे. या ज‍ीवघेण्‍या आजारामुळे लायबेरियात 4 हजार लोकांचा जीव गेला आहे.

मोर गेटी इमेजेसचे वरिष्‍ठ स्टाफ फोटोग्राफर आहे. त्यांनी यापूर्वीही अनेक पुरस्कार प्राप्त केले आहे. मोर यांना जवळ-जवळ 15 लाख 86 हजार रुपये रोख देण्‍यात आली. लंडनमध्‍ये झालेल्या गाला सेरेमनीत पुरस्काराची घोषणा करण्‍यात आली. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या श्रेणी अनेक छायाचित्रकारांनी पुरस्कार जिंकले आहे.
सोनी वर्ल्ड फोटोग्राफी पुरस्काराचे हे आठवे वर्ष आहे. या वर्षी 171 देशांतील छायाचित्रकारांनी 1 लाख 73 हजार 444 प्रवेशिका पाठवल्या होत्या. यात मानवी स्वारस्य, निसर्ग आणि सामाजिक न्याय या विषयांचे प्रतिबिंब छायाचित्रात द‍िसत होते. ही स्पर्धा प्रत्येक व्यावसायिक छायाचित्रकारांपासून हौशी आणि विद्यार्थ्‍यांसाठी खुली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सोनी वर्ल्ड फोटोग्राफी पुरस्कार विजेत्यांचे छायाचित्रे....