आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Edward Snowden Would Be Willing To Return To US For Fair Trial

निष्पक्ष सुनावणीची खात्री द्यावी, तरच मायदेशी परतेन : स्नोडेन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मँचेस्टर - अमेरिकेत परतण्याची इच्छा आहे, परंतु आपल्यावरील खटल्याची सुनावणी निष्पक्ष पद्धतीने केली जाईल, याची खात्री देण्यात यावी. त्यानंतरच आपण मायदेशी परतू. मग भलेही तुरुंगात जावे लागले तरी चालेल, असे स्नोडेनने स्पष्ट केले आहे.

स्नोडेनने रशियातून स्काइपद्वारे न्यू हॅम्पशायरमधील आपल्या समर्थकांशी संवाद साधला. त्यात अमेरिकेतील सरकारने खटला निष्पक्ष चालवण्याची खात्री द्यावी, असे म्हटले. २०१३ मध्ये स्नोडेनने अमेरिकेशी संबंधित गोपनीय माहिती जाहीर केली होती. अमेरिकेत त्याच्यावर खटला चालवण्यात आल्यास व तो दोषी आढळून आल्यास त्याला ३० वर्षांची कैद होऊ शकते. शनिवारी न्यू हॅम्पशायर येथे लिबर्टी फोरमकडून आयोजित एका कार्यक्रमात त्याने आपले मनोगत मांडले. त्याचबरोबर मायदेशी परतण्याची इच्छाही त्याने बोलून दाखवली. भलेही तुरुंगात जावे लागले तरी चालेल, असे त्याने म्हटले आहे, परंतु त्यासाठी अमेरिकेतील सरकारने अगोदर निष्पक्ष सुनावणी होईल, याची खात्री द्यावी, असे म्हटले आहे.