आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Egypt Brotherhood Chief Mohammed Badie Sentenced To Death

ब्रदरहूडच्या म्होरक्यासह १३ जणांना मृत्युदंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कैरो - इजिप्तच्या एका न्यायालयाने निर्बंध असलेल्या मुस्लिम ब्रदरहूड संघटनेच्या म्होरक्या मोहंमद बैदीसह १३ जणांना मृत्युदंड देण्यात आला. सरकारच्या वतीने शनिवार शिक्षेला दुजोरा देण्यात आला. त्याशिवाय अमेरिकी वंशाचे मोहंमद सुलतानसह ३६ जणांना अफवा पसरवल्याच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. देशाच्या विरोधात हिंसाचार पसरवणे, कट रचणे आणि अराजकतेचा त्यांच्यावर आरोप होता.

मुस्लिम ब्रदरहूड संघटनेचे बैदी हे सर्वात मोठे नेते मानले जातात. सरकारी आदेशाच्या विरोधात समर्थकांना भडकावण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होता. परंतु इजिप्तच्या पहिल्या निवडणुकीत मुस्लिम ब्रदरहूडने मोहंमद मुर्सी यांना राष्ट्राध्यक्ष बनवले होते. परंतु लष्कराने मुर्सी यांना हटवले होते. त्यानंतर ब्रदरहूडने लष्कर आणि इजिप्तच्या नवीन सरकारच्या विरोधात हिंसक आंदोलन केले.

२०१३ मध्ये दहशतवादी संघटना
मुस्लिम ब्रदरहूड संघटनेला २०१३ मध्ये दहशतवादी संघटना म्हणून जाहीर करण्यात आले होते. जुलै २०१३ नंतर सुमारे २२ हजार लोकांना अटक करण्यात आली होती.