(फोटो: रिपोर्टिंग करताना इजिप्तची पत्रकार लामिया हम्दीन)
काहिरा- इजिप्तच्या एका महिला पत्रकाराचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. लामिया हम्दीन असे या महिला पत्रकाराचे नाव असून दोन वर्षाच्या मुलाला कुशीत घेऊन ती रिपोर्टिंग करताना दिसते आहे.
'पत्रकार लामियाचे असे वागणे बरे नव्हे', असे म्हणत अनेकांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली आहे. परंतु, एक आई असल्यामुळे तिने जे केले ते योग्यच असल्याचे खुद्द लामियाने म्हटले आहे.
मी देखील एक सामान्य महिला आहे. डे-केअर सेंटरमधून मुलाला घेतले आणि त्याला रिपोर्टिंगला सोबत घेऊन आली. मी माझ्या कामाबाबत कधीही तडजोड करू शकत नाही. मात्र, मुलाला
आपल्यासोबत आणण्याशिवाय माझ्याकडे दुसरा मार्ग नसल्याचे लामियाने 'Youm7 न्यूज वेबसाइट'ला सांगितले.
काही युजर्सनी पत्रकार लामियाची तुलना इटलीच्या नेत्या लीसिया रॉनज्यूलीसोबत केली आहे. 2010 मध्ये लीसिया या देखील कामावर येताना आपल्या मुलीला सोबत आणायच्या.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, इटलीच्या नेत्या लीसिया रॉनज्यूलीचे Photo...