आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मशीद हल्ला : इजिप्तच्या दहशतवाद्यांविरूद्ध सर्जिकल स्ट्राईक, अनेक दहशतवादी ठिकाणांचा खात्मा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अध्यक्ष अब्दुल फत्तेह अल-सीसीने बदला घेण्याची घोषणा केली होती. - Divya Marathi
अध्यक्ष अब्दुल फत्तेह अल-सीसीने बदला घेण्याची घोषणा केली होती.

इंटरनॅशनल डेस्क - मशीदीवर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देतांना इजिप्तच्या लष्कराने अनेक दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. यामध्ये अनेक दहशतवादी मारले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शुक्रवारी सिनाई प्रांतात अल अरिश शहरातील अल-रवादा मशीदीवर झालेल्या हल्ल्यात 300 पेक्षा अधिक नागरिक मृत्यू झाले. त्यानंतर अध्यक्ष अब्दुल फत्तेह अल-सीसीने नर्णय घेतला की, देशातील दहशतवाद्यांचा खात्मा करणार.

 

दहशतवाद्यांच्या गाड्यांचा ताबा उद्ध्वस्त

- इजिप्तचे आर्मी स्पोक्सपर्सन तमेर अल-रेफाईनुसार, एअरफोर्सने नॉर्थ सिनाई प्रांतातील दहशतवादी ठिकाणांना आपला निशाणा केले. यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले. लष्कराने यादरम्यान दहशतवाद्यांच्या गाड्याही नष्ट केल्या.

 

दहशतवाद्यांचा अड्डा नॉर्थ सिनाई
- अनुमानानुसार, सिनाईमध्ये दिड हजार दहशतवादी सक्रिय आहेत. हे दहशतवादी काहिरा आणि जवळच्या शहराला आपले लक्ष्य करतात. यांची लिंक इसिसशी जोडली असल्याचा संशय आहे. 
- या दहशतवाद्यांनी रशियातील एक विमान ऑक्टोबर 2015 मध्ये पाडल्याची जबाबदारी उचलली होती.

 

2011नंतर वाढले हल्ले
- जानेवारी 2011 मध्ये माजी अध्यक्ष होस्नी मुबारकचे सरकार संपुष्टात आल्यानंतर नॉर्थ सिनाई परिसरात दहशतवादी हल्ले वाढले. माजी इस्लामिस्ट अध्यक्ष मोहम्मद मुर्सीनंतर पोलिस आणि लष्करावरील हल्लेही वाढले. तेव्हापासून आतापर्यंत सातशेहून अधिक सुरक्षा कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला. 2014 मध्ये याठिकाणी सुसाईड बॉम्बमध्ये 31 सैनिक मृत्यूमुखी पडले होते. त्यानंतर याठिकाणी इमर्जन्सीची घोषणा करण्यात आली होती.

 

 

पुढील स्लाईडवर पाहा - PHOTOS

बातम्या आणखी आहेत...