आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परंपरेच्या नावाने अत्याचार, इजिप्तमध्‍ये मुलींना नकोय सुट्ट्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इजिप्तच्या सोहागमध्‍ये सोसायटी ऑफ इस्लामिक सेंटरमध्‍ये आपले दु:ख सांगताना महिला आणि मुली. - Divya Marathi
इजिप्तच्या सोहागमध्‍ये सोसायटी ऑफ इस्लामिक सेंटरमध्‍ये आपले दु:ख सांगताना महिला आणि मुली.
कैरो - उन्हाळ्याच्या सुट्टीत लोक थंड हवेच्या ठिकाणी फ‍िरायला जातात. मात्र इजिप्तमध्‍ये तसे नाही. येथे उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्या, की मुली अस्वस्थ होतात. त्यांना खतन्याची भीती वाटत आहे. वास्तविक इजिप्तमध्‍ये उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्‍ये खतना केला जातो. याने मुलींचे आरोग्य सुधारण्‍यास वेळ मिळेल. सर्वसाधारणपणे 9 ते 12 वर्षांच्या मुलींचा खतना करण्‍यात येतो. सरकारने मेमध्‍ये प्रसिध्‍द केलेल्या अहवालानुसार, इजिप्तमध्‍ये 92 टक्के विवाहित महिला खतना या प्रक्रियेतून गेलेल्या असतात. 2000 मध्‍ये हा आकडा 97 टक्के होता. संयुक्त राष्‍ट्राच्या आकड्यांनुसार अशा प्रक्रियेतून जाणा-या सर्वात जास्‍त महिला या इजिप्तमध्‍ये आहे.
इजिप्तसह 30 देशांमध्‍ये मुली आणि महिलांसाठी खतनासारखी परंपरा चालू आहे. विशेषत: आफ्रिका आणि पश्चिम आशियातील देशांमध्‍ये ही परंपरा सर्वसामान्य आहे. या देशांमध्‍ये मुलींना विवाहासाठी तयार करण्‍यासाठी क्लिटोरिस कापणे आवश्‍यक असते, असे मानले जाते. यामुळे महिलांमध्‍ये गुप्तरोगाचे प्रमाण वाढत चालले आहे.

पुढील स्लाइड्सवर जाणून, इतर देशांविषयी...